गृह मंत्रालय

आपत्कालीन स्थिती व्यवस्थापन क्षेत्रातील सहकार्यावर संयुक्त रशियन-भारतीय आयोगाच्या दुसऱ्या बैठकीचे रशियातील मॉस्को येथे आयोजन

Posted On: 28 AUG 2024 9:45PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 28 ऑगस्ट 2024

आपत्कालीन स्थिती व्यवस्थापन क्षेत्रातील सहकार्यावर संयुक्त रशियन-भारतीय आयोगाची दुसरी बैठक आज 28 ऑगस्ट 2024 रोजी रशियातील मॉस्को येथे झाली. भारताचे गृहराज्यमंत्री  नित्यानंद राय हे भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करत आहेत.

दौऱ्याच्या पहिल्या दिवशी, 2025-2026 साठी आपत्कालीन स्थिती व्यवस्थापन क्षेत्रातील सहकार्यावर संयुक्त रशियन-भारतीय आयोगाच्या कृती आराखड्यावर भारताचे गृहराज्यमंत्री नित्यानंद राय आणि रशियाचे नागरी संरक्षण मंत्री, आपत्कालीन परिस्थिती आणि नैसर्गिक आपत्तींचे परिणाम निर्मूलन मंत्री  कुरेनकोव्ह अलेक्झांडर व्याचेस्लाव्होविच यांनी स्वाक्षरी केली.

दोन्ही देशांनी 2025-2026 या कालावधीत या आराखड्याची  अंमलबजावणी करण्याबाबत सहमती दर्शवली आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या क्षेत्रातील सर्वोत्तम पद्धती आणि शिकलेल्या धड्यांची देवाणघेवाण सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. डिसेंबर 2010 मध्ये आपत्कालीन व्यवस्थापन क्षेत्रात सहकार्यासाठी झालेला आंतर-सरकारी करार आणि आपत्कालीन परिस्थिती परिणाम प्रतिबंध आणि निर्मूलनात  सहकार्यासाठी भारत-रशिया संयुक्त आयोग  (2013) स्थापन करण्यासाठी विनियमन यांसारख्या भारत आणि रशिया यांच्यातील मागील करारांच्या अंमलबजावणीसाठी धोरण आखण्याच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वपूर्ण आहे.आपत्कालीन व्यवस्थापन क्षेत्रातील सहकार्यावरील भारत-रशियन संयुक्त आयोगाची पहिली बैठक 2016 मध्ये नवी दिल्ली येथे झाली होती.

बैठकीत सहकार्याच्या समग्र चौकटीअंतर्गत  तीन विशिष्ट मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली:

जोखीम अंदाज आणि आपत्कालीन प्रतिसादासाठी अंतराळ देखरेख तंत्रज्ञानाचा वापर.

मोठ्या प्रमाणावरील  आपत्तींना सामोरे जाण्यासंबंधी अनुभवांची देवाणघेवाण.

अग्निशमन आणि बचाव तज्ञांच्या प्रशिक्षण क्षेत्रात सहकार्य.

बैठकीतील निष्कर्षांच्या  आधारे, भारतीय आणि रशियन शिष्टमंडळांनी त्यांचे हेतू स्पष्ट  केले:

(i) आपत्कालीन स्थिती व्यवस्थापनाच्या क्षेत्रात आणखी सहकार्य विकसित करण्यासाठी संयुक्त प्रयत्नांना गती देणे

(ii) आपत्ती निरीक्षण आणि अंदाज, बचाव तज्ञ  आणि अग्निशामकांचे प्रशिक्षण यासह आपत्कालीन व्यवस्थापनातील सर्वोत्तम पद्धतींची देवाणघेवाण करणे.

(iii) प्रख्यात शैक्षणिक आणि संशोधन संस्थांमधील सहकार्य वाढवणे, दोन्ही देशांमध्ये  आपत्कालीन स्थिती व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञांचे प्रशिक्षण.

iv) 2026 मध्ये भारतात आपत्कालीन स्थिती व्यवस्थापन क्षेत्रात सहकार्यावरील भारत-रशियन संयुक्त आयोगाच्या  पुढील बैठकीचे आयोजन करणे.


S.Patil/S.Kane/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 



(Release ID: 2049583) Visitor Counter : 42