वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

भारत हा जागतिक दर्जाच्या किफायतशीर आरोग्य सेवा देणारे ठिकाण आणि जागतिक औषध निर्मितीत अग्रणी: केंद्रीय वाणिज्य आणि उद्योजकता राज्यमंत्री जितिन प्रसाद


औषधनिर्माण आणि आरोग्यसेवा प्रदर्शनासाठी आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचे प्रसाद यांच्या हस्ते उद्घाटन

Posted On: 28 AUG 2024 7:55PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 28 ऑगस्ट 2024

भारत हा जागतिक दर्जाच्या किफायतशीर आरोग्य सेवा देणारे ठिकाण आणि जागतिक औषध निर्मितीत अग्रणी म्हणून उदयास आला आहे असे प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योजकता राज्यमंत्री जितीन प्रसाद यांनी केले. भारतीय औषधनिर्माण निर्यात प्रोत्साहन परिषद (सीएपीईएक्सआयएल) आणि वाणिज्य आणि उद्योजकता मंत्रालयाने आज उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथे आयोजित केलेल्या तीन दिवसीय औषधनिर्माण आणि आरोग्यसेवा प्रदर्शनासाठी (आयपीएचईएक्स 2024) आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचे उद्घाटन करताना बोलत होते. त्यांनी भारतीय औषधनिर्मिती उद्योगाला जगाचे आरोग्य सेवा संरक्षक बनण्याच्या दिशेने काम करण्याचे आवाहन केले.

औषधनिर्माण उद्योगाने निर्यात वाढवण्याचे आणि वाढीच्या उदयोन्मुख संधींचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले. 'जागतिक रसशाळा (औषधनिर्मितीशाळा)' म्हणून भारताला ओळखले जाते हे उद्धृत करताना प्रसाद म्हणाले की आपण केवळ जेनेरिक क्षेत्रातील आपल्या बलस्थानावर लक्ष केंद्रित न करता आपल्या मागच्या-पुढच्या सुसंगततेबाबतही खबरदारी घेतली पाहिजे. आपण उत्पादन विकासासाठी प्रयत्न करून नवीन मानक प्रस्थापित करणे महत्वाचे आहे असेही त्यांनी नमूद केले.

उद्योगांनी अभिनवता, गुणवत्ता आणि जागतिक बाजारपेठेसोबत काम करण्यावर भर द्यावा, असे आवाहन मंत्र्यांनी केले. "आंतरराष्ट्रीय स्पर्धात्मकता खूप महत्त्वाची असेल. नवीन घडामोडी आणि चांगल्या उत्पादन पद्धतींची माहिती ठेवणे महत्त्वाचे आहे" असे मत त्यांनी मांडले. एपीआय आणि वैद्यकीय उपकरणांसाठी सरकारने पीएलआयसारख्या अनेक योजना राबविल्या आहेत, असेही त्यांनी निदर्शनास आणले.

“तीन दिवसीय औषधनिर्माण प्रदर्शन आयपीएचईएक्स हे भारतातील आणि जगभरातील देशांतर्गत उद्योगांना जोडण्यासाठी आणि व्यवसाय करण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ प्रदान करेल. हे प्रदर्शन तुम्हाला सक्रियपणे नवीन पुरवठादार शोधणाऱ्या किंवा विद्यमान प्रकल्पांच्या सध्याच्या प्रगतीचे मूल्यांकन करू पाहणाऱ्या नवीन आणि विद्यमान ग्राहकांना भेटण्याची संधी देईल” असा विश्वास प्रसाद यांनी व्यक्त केला.


S.Patil/V.Joshi/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 
 

 



(Release ID: 2049541) Visitor Counter : 32


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu