दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

अनाहूत व्यावसायिक संप्रेषण समस्येचे निराकरण करण्यासाठी ट्रायद्वारे पुनरावलोकन सल्लामसलत पत्र जारी

Posted On: 28 AUG 2024 4:08PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 28 ऑगस्ट 2024

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय) ने आज "दूरसंचार व्यावसायिक संप्रेषण ग्राहक प्राधान्य विनियम, 2018 (टीसीसीसीपीआर-2018) चे पुनरावलोकन" यावर सार्वजनिक टिप्पण्या मागणारे सल्लामसलत  पत्र जारी केले आहे.

अनाहूत व्यावसायिक संप्रेषण समस्येचे निराकरण करण्यासाठी फेब्रुवारी-2019 मध्ये टीसीसीसीपीआर-2018 ची अंमलबजावणी करण्यात आली होती.या विनियमांचा उद्देश ग्राहकांचे अनाहूत प्रचारात्मक कॉल्स आणि संदेशांपासून संरक्षण करणे हा आहे, तसेच ज्या ग्राहकांनी संमती दिली आहे किंवा ते प्राप्त करण्यासाठी प्राधान्ये निर्धारित केली आहेत त्यांना लक्ष्यित संप्रेषणे पाठविण्याची अनुमती देणे हा आहे.

नियामक चौकटीच्या अंमलबजावणीदरम्यान काही समस्या आढळून आल्या आहेत. या सल्लामसलत पत्राचा उद्देश  अंमलबजावणी दरम्यान लक्षात आलेल्या समस्या समोर आणणे ज्यावर त्वरित लक्ष देणे आवश्यक आहे. या समस्यांशी संबंधित नियमांच्या तरतुदींमध्ये दुरुस्तीची आवश्यकता असू शकते. सल्लामसलत पत्रामध्ये चर्चा करण्यात आलेल्या समस्यांच्या विस्तृत श्रेणीमध्ये पुढील बाबींचा  समावेश आहे:-

• व्यावसायिक संप्रेषणाची व्याख्या.

• तक्रार निवारणाशी संबंधित तरतुदी.

• यूसीसी शोध प्रणाली आणि त्यावरील कारवाई

• वित्तीय दंड  संबंधित तरतुदी.

• प्रेषक आणि टेलीमार्केटर्सशी संबंधित तरतुदी.

•  व्हॉइस कॉल आणि एसएमएसच्या मोठ्या संख्येचे विश्लेषण.

विनियमन अधिक मजबूत करण्यासाठी ट्राय विविध मुद्द्यांवर सूचना मागवत असून त्यात स्पॅम कॉलद्वारे लोकांना त्रास देणाऱ्या बिगर- नोंदणीकृत टेलिमार्केटर्स विरुद्ध कठोर तरतुदी, सुधारित तक्रार निवारण यंत्रणा, अधिक प्रभावी युसीसी  शोध प्रणाली, नियामक तरतुदींच्या उल्लंघनासाठी मजबूत आर्थिक दंड आणि प्रेषक आणि टेलिमार्केटरसाठी सुधारित नियम इत्यादींचा समावेश आहे. हे सल्लामसलत पत्र  यूसीसीला परावृत्त करण्यासाठी व्हॉइस कॉल आणि एसएमएससाठी भिन्न दरांच्या शक्यतेची देखील चाचपणी करत आहे.

हे सल्लामसलत पत्र ट्रायच्या www.trai.gov.in या वेबसाइटवर उपलब्ध आहे.सल्लामसलत पत्राबाबत हितधारकांकडून 25 सप्टेंबर 2024 पर्यंत लेखी टिप्पण्या मागविण्यात आल्या आहेत. प्रति-टिप्पण्या, असल्यास, 9 ऑक्टोबर 2024 पर्यंत सादर करता येतील. टिप्पण्या आणि प्रति-टिप्पण्या,शक्यतो इलेक्ट्रॉनिक स्वरूपात  advqos@trai.gov.in या ई-मेल  पत्त्यावर पाठवाव्यात.

अधिक स्पष्टीकरण/माहितीसाठी, जयपाल सिंग तोमर, सल्लागार (QoS-II) यांच्याशी advqos@trai.gov.in या ईमेल आयडीवर संपर्क साधता येईल.

S.Patil/S.Kane/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 
 
 

 


(Release ID: 2049355) Visitor Counter : 54