राष्ट्रपती कार्यालय

जन्माष्टमीच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशबांधवांना दिल्या शुभेच्छा

Posted On: 25 AUG 2024 6:56PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 25 ऑगस्ट 2024

 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जन्माष्टमीच्या पूर्वसंध्येला सर्व देशबांधवांना शुभेच्छा दिल्या असून त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे:-

“जन्माष्टमीच्या पर्वानिमित्त, मी माझ्या सर्व देशबांधवांना आणि परदेशात राहणाऱ्या भारतीयांना हार्दिक शुभेच्छा देते.

जन्माष्टमीच्या दिवशी आपण भगवान श्रीकृष्णाची पूजा करतो.  आनंदाचा हा सण आपल्याला भगवान श्री कृष्णाच्या दिव्य आदर्शांप्रति स्वतःला समर्पित करण्याची प्रेरणा देतो. श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यातील संवाद म्हणजे‘श्रीमद भगवद्गीता’  संपूर्ण मानवजातीसाठी प्रेरणा आणि ज्ञानाचा चिरंतन स्रोत आहे.

यानिमित्ताने आपण भगवान श्रीकृष्णाची शिकवण आत्मसात करूया तसेच देशाची प्रगती आणि समृद्धी यासाठी कार्य करण्याचा संकल्प करूया."

राष्ट्रपतींचा संदेश हिंदीमध्ये पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

* * *

S.Patil/S.Mukhedkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2048775) Visitor Counter : 15


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil