संरक्षण मंत्रालय

केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी अमेरिकेच्या नौदल पृष्ठीय युद्ध केंद्राला (Naval Surface Warfare Centre - NSWC) दिली भेट

Posted On: 25 AUG 2024 12:46PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 25 ऑगस्ट 2024

 

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आपल्या अमेरिकेच्या दौऱ्यादरम्यान, टेनेसी मधील मेम्फिस इथल्या नौदल पृष्ठीय युद्ध केंद्रातील (Naval Surface Warfare Centre  - NSWC) विल्यम बी मॉर्गन लार्ज कॅव्हिटेशन चॅनेल (LCC) या मोठ्या जल बोगद्याला भेट दिली.  एलसीसी हा जगातला सर्वात असा मोठा जल बोगदा आहे, जिथे  पाणबुड्या, जलक्षेपणास्त्रे (torpedoes) टॉरपीडो, नौदल पृष्ठीय जहाजे आणि जहाजांच्या पंख्यांची (propeller) चाचणी करण्यासाठीच्या तांत्रिकदृष्ट्या प्रगत  सुविधा उपलब्ध आहेत. या भेटीत राजनाथ सिंह यांना या जलबोगद्याच्या सुविधेविषयी माहिती दिली गेली, तसेच या जलबोगद्यात सुरु असलेले प्रयोगही त्यांनी पाहिले.

यावेळी राजनाथ सिंह यांच्यासोबत अमेरिकेतील भारताचे राजदूत, भारतीय नौदलाचे नौदल संचालन महासंचालक तसेच संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (DRDO) तंत्रज्ञानविषयक सल्लागार आणि इतर महत्वाच्या व्यक्ती उपस्थित होत्या. या भेटीदरम्यान अमेरिकेच्या नौदल धोरणाच्या उप-अवर सचिवांनी राजनाथ सिंह यांचे स्वागत केले, तर नौदल पृष्ठीय युद्ध केंद्राचे (Naval Surface Warfare Centre  - NSWC) कमांडर आणि तंत्रज्ञानविषयक संचालकांनी या जलबोगद्याच्या सुविधेविषयीची माहिती सिंह यांना दिली. 

यावेळी भारतात अशाच प्रकारची स्वदेशी आरेखनाची  सुविधा विकसित करण्यासाठी मांडलेल्या प्रस्तावाला पाठबळ देण्याबद्दलही चर्चा केली गेली.

 

* * *

NM/T.Pawar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2048708) Visitor Counter : 16