वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल सिंगापूर मध्ये दुसऱ्या भारत सिंगापूर मंत्रीस्तरीय गोलमेज परिषदेला उपस्थित राहणार


व्यापार आणि गुंतवणूक क्षेत्रांमधील द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यासाठी वाणिज्य मंत्र्यांकडून होणार नवीन धोरणे आखण्यासंबधी विचारविनिमय

Posted On: 25 AUG 2024 11:52AM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 25 ऑगस्ट 2024

 

दुसरी भारत सिंगापूर मंत्रीस्तरीय गोलमेज परिषद 26 ऑगस्ट 2024 रोजी सिंगापूरला आयोजित केली आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल या दुसऱ्या भारत सिंगापूर गोलमेज परिषदेत सहभागी होणार आहेत. त्यांच्याबरोबर वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहारमंत्री निर्मला सीतारामन, परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. सुब्रमण्यम जयशंकर, रेल्वे तसेच माहिती आणि प्रसारण, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव हे सुद्धा सहभागी होऊन सिंगापूर मधील त्यांचे समपदस्थ आणि संबंधित नेत्यांशी चर्चा करतील.

25 ऑगस्ट रोजी वाणिज्य मंत्री पियुष गोयल सिंगापूर मधील उद्योग विश्वातील जागतिक महत्त्वाच्या मान्यवरांशी चर्चा करतील. यामध्ये डीबीएस बँक, Temasek Holdings, OMERS, Keppel Infrastructure आणि Owners Forum सहभागी होतील. वाणिज्यमंत्र्यांनी त्यांच्या संदेशात ही माहिती दिली आहे. यावेळी भारतामधील विविध बाजारपेठीय संधी आणि गतिशील विकास पथ या नुसार व्यापार आणि गुंतवणूक क्षेत्रांमधील द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यासाठी  कोणती धोरणे आखावीत यावर विचारविनिमय होईल.

ISMR ही भारत आणि सिंगापूर यांच्यामधील द्विपक्षीय संबंधांसाठी विषय पत्रिका ठरवणारी एकमेव कार्यपद्धती आहे. नवी दिल्लीत सप्टेंबर 2022 मध्ये ISMR ची बैठक झाली होती.  भारत आणि सिंगापूर मधील द्विपक्षीय भागीदारीला असणाऱ्या विविध आयामांचा आढावा घेणे आणि त्यांचा  पाया रुंदावणे आणि विकास यासाठी उपयुक्त ठरतील नवीन मार्गांची चाचपणी करणे यासाठी ही दुसरी बैठक होत आहे.

भारतासाठी परदेशी थेट गुंतवणुकीसंदर्भात सिंगापूर हे एक महत्त्वाचे  उगमस्थान  आहे. वर्ष 2023-24 मध्ये  भारतामधील थेट परदेशी गुंतवणुकीतील सर्वाधिक म्हणजे अंदाजे 11. 77 बिलियन डॉलरची गुंतवणूक  सिंगापूरमधून केली गेली होती.  एप्रिल 2000 ते मार्च 2024 या वर्षांमध्ये सिंगापूरमधून भारतात एकूण 159.94 बिलियन डॉलरची गुंतवणूक झाली होती.  द्विपक्षीय व्यापारात वर्ष 2023-24 मध्ये 35.61 बिलियन डॉलर्सचा व्यापार करून सिंगापूर हा भारताचा सहावा सर्वात मोठा भागीदार देश आहे आणि त्यानुसार आसियान देशांशी भारताच्या व्यापारी भागीदारीत सिंगापूरची  भागीदारी साधारण 29 टक्के एवढी मोजली गेली. 

 

* * *

NM/V.Sahajrao/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2048699) Visitor Counter : 67