कोळसा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रीय कोळसा खाण सुरक्षा अहवाल पोर्टल: वाढीव सुरक्षेच्या दिशेने घेतलेली झेप

Posted On: 24 AUG 2024 1:30PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 24 ऑगस्ट 2024

 

कोळसा कंपन्यांच्या सुरक्षा स्थितीचे मूल्यांकन करण्याच्या उद्देशाने कोळसा मंत्रालयाचे सचिव अमृत लाल मीना यांनी घेतला राष्ट्रीय कोळसा खाण सुरक्षा अहवाल पोर्टलच्या सद्यस्थितीच्या विकासात्मक कामगिरीचा आढावा.

या आढावा बैठकीला कोल इंडिया लिमिटेड (सीआयएल)चे अध्यक्ष आणि सीआयएलच्या उपकंपन्यांचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक तसेच मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

देशभरातील सर्व कोळसा खाणींमध्ये 100% सुरक्षा ऑडिट करणे अत्यंत गरजेचे आहे, यावर मीना यांनी भर दिला. मंत्रालयाच्या "शून्य अपघात -पूर्ण- सुरक्षितता" या वचनबद्धतेचा त्यांनी पुनरुच्चार केला. सीआयएलच्या अध्यक्षांनी पोर्टलचे प्रात्यक्षिक दाखवले आणि बैठकीला उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांनी कोळसा खाणींमध्ये सुरक्षा विषयक सुधारणांना गती देण्यासाठी आपली मते मांडली.

पोर्टलच्या प्रात्यक्षिकांमध्ये दोन प्रमुख मोड्युल दाखवण्यात आले: अपघात मॉड्यूल आणि सुरक्षा ऑडिट मॉड्यूल; कोळसा खाणींमध्ये काम करताना येणारे परिचालन विषयक आणि कामाच्या स्वरूपाशी संबंधित अनेक अडथळे पाहता, कोळसा खाणींमध्ये अतिशय कठोर असे सुरक्षेचे निकष असणे अत्यंत आवश्यक आहे. कोळसा कंपन्या त्यांच्या दृष्टी आणि ध्येयाशी एकरूप होऊन सर्वसमावेशक सुरक्षा धोरण राबविण्यासाठी समर्पित आहेत.

राष्ट्रीय कोळसा खाण सुरक्षा अहवाल पोर्टलने सुरक्षा व्यवस्थापन क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती साध्य केली आहे. अपघात मॉड्युलवर 24 तासाच्या आतील अहवाल आणि अपघातांचे कार्यक्षम व्यवस्थापन, त्वरित प्रतिसाद आणि संपूर्ण विश्लेषण मिळू शकेल. सुरक्षा ऑडिट मॉड्यूलमुळे परीक्षण प्रक्रियेत वाढ होईल, कोळसा खाण क्षेत्रातील सुरक्षा पद्धती आणि नियमांना बळकटी मिळेल आणि या दोन्ही प्रगत मॉड्यूल्सचे एकत्रीकरण करून, सुरक्षा व्यवस्थापनासाठी नवीन बेंचमार्क स्थापन करून, गंभीर सुरक्षा आव्हानांना तोंड देणे शक्य होईल.

कोळसा मंत्रालय आणि सार्वजनिक क्षेत्रातील कोळसा कंपन्या, कोळसा मंत्र्यांच्या नेतृत्वाखाली संभाव्य धोके ओळखून ते कमी करणाऱ्या जोखीम मूल्यांकन प्रक्रियेद्वारे "खाण सुरक्षा संस्कृती" वाढवण्यासाठी वचनबद्ध आहेत. नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आणि धोरणांचा लाभ घेऊन, सुरक्षा आणि उत्पादकता या संस्कृतीला प्रोत्साहन देणे आणि कोळसा खाण क्षेत्रातील सर्व कर्मचाऱ्यांचे कल्याण सुनिश्चित करणे हे कोळसा मंत्रालयाचे उद्दिष्ट आहे.

 

* * *

S.Nilkanth/B.Sontakke/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2048445)