सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

"भारतातील वेतनपट अहवाल : रोजगार परिदृश्य – जून, 2024" प्रसिद्ध

Posted On: 23 AUG 2024 4:51PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 23 ऑगस्ट 2024

सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने  सप्टेंबर 2017 या कालावधीची औपचारिक क्षेत्रातील रोजगाराशी संबंधित आकडेवारी जारी केली आहे. यासाठी  तीन प्रमुख योजनांतर्गत सदस्यत्व घेतलेल्या ग्राहकांच्या संख्येची माहिती वापरण्‍यात आली आहे. यामध्‍ये कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ) योजना,कर्मचारी राज्य विमा (ईएसआय) योजना आणि राष्ट्रीय पेन्शन योजना (एनपीएस) यांचा समावेश आहे.

यासंबंधी संपूर्ण अहवाल येथे मिळू शकेल - Payroll_Reporting-June,2024_220824.pdf (mospi.gov.in)

2.1 कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजना:

• 2023-24 या वर्षात नवीन ईपीएफ सदस्यांची एकूण संख्या 1,09,93,119 होती.

• जून 2024 मध्ये एकूण नवीन ईपीएफ सदस्यांची संख्या 10,24,851 आहे. ही संख्‍या  मे 2024 मध्ये 10,31,982 होती.

• नवीन ईपीएफ सदस्यांचे लिंगनिहाय टक्केवारी वितरण:

2.2  कर्मचारी राज्य विमा योजना:

• 2023-24 या वर्षात, नवीन नोंदणीकृत आणि ईएसआय  योजनेंतर्गत योगदान देणारे  कर्मचारी 1,67,60,872 होते.

• जून 2024 मध्ये नवीन नोंदणीकृत आणि ईएसआय  योजनेंतर्गत योगदान देणारे  कर्मचारी 16,19,878 आहेत. मे 2024 च्या महिन्यात ही संख्या 17,33,128 होती.

• नवीन नोंदणीकृत आणि ईएसआय  योजनेंतर्गत योगदान देणाऱ्या  कर्मचाऱ्यांची  लिंगनिहाय टक्केवारी:

2.3 राष्ट्रीय पेन्शन योजना (एनपीएस):

• 2023-24 या वर्षामध्‍ये , एनपीएस  अंतर्गत योगदान देणाऱ्या नवीन सदस्यांची एकूण संख्या 9,73,428 होती.

• जून 2024 मध्ये एनपीएसअंतर्गत योगदान देणाऱ्या नवीन सदस्यांची एकूण संख्या 64,799 आहे. ही संख्‍या मे 2024 च्या महिन्यात 79,080 होती.

• एनपीएस अंतर्गत योगदान देणाऱ्या नवीन सदस्यांची लिंगनिहाय टक्केवारी:

N.Chitale/S.Bedekar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(Release ID: 2048190)