पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोलंडमध्ये वॉर्सा इथल्या नवानगरचे जाम साहेब यांच्या स्मारकाला वाहिली आदरांजली

Posted On: 21 AUG 2024 10:27PM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पोलंड भेटीत आज वॉर्सा इथल्या नवानगरचे जाम साहेब यांच्या स्मारकाला (Jam Saheb of Nawanagar Memorial) आदरांजली वाहिली. दुसऱ्या महायुद्धामुळे बेघर झालेल्या पोलंड मधल्या मुलांना निवारा मिळावा तसेच त्यांचे व्यवस्थित संगोपन व्हावे यासाठी जाम साहेब दिग्विजयसिंहजी रणजितसिंहजी जडेजा यांनी मानवतावादी भावनेने दिलेल्या योगदानाला उजाळा देण्यासाठी पोलंडमधील वॉर्सा इथे नवानगरचे जाम साहेब यांचे स्मारक उभारण्यात आले आहे. वॉर्सा येथील नवानगरच्या जाम साहेबांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करतानाची क्षणचित्रेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
एक्स या समाजमाध्यमावर सामायिक केली आहेत.

या संदर्भात एक्स या समाजमाध्यमावर लिहिलेल्या संदेशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, ;

मानवता आणि करुणा हा न्याय्य आणि शांततापूर्ण जगासाठीचा सर्वात महत्त्वाचा पाया आहे. वॉर्सा इथले नवानगरचे जाम साहेब यांचे स्मारक, दुसऱ्या महायुद्धामुळे बेघर झालेल्या पोलंडमधील मुलांना निवारा मिळावा आणि त्यांचे व्यवस्थित संगोपन व्हावे यासाठी जाम साहेब दिग्विजयसिंहजी रणजितसिंहजी जडेजा यांनी मानवतावादी भावनेतून दिलेल्या योगदानाला उजाळा देते. जाम साहेब यांना पोलंडमध्ये प्रेमाने डोब्री महाराज म्हणूनही ओळखले जाते.

या स्मारकाला आज मी आदरांजली वाहिली. त्याची ही काही क्षणचित्रे.

***

SonalT/TusharP/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2047609) Visitor Counter : 27