गृह मंत्रालय
श्री अमरनाथ यात्रा यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सर्व सुरक्षा कर्मचारी, श्री अमरनाथ जी श्राइन बोर्ड, जम्मू-काश्मीर प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थांचे केले अभिनंदन
प्रविष्टि तिथि:
21 AUG 2024 9:13PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 ऑगस्ट 2024
श्री अमरनाथ यात्रा यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल सर्व सुरक्षा कर्मचारी, श्री अमरनाथ जी श्राइन बोर्ड, जम्मू-काश्मीर प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थांचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अभिनंदन केले .
एक्स या समाजमाध्यमावरील एका पोस्टमध्ये अमित शाह म्हणाले की, श्री अमरनाथ यात्रा यशस्वीरित्या पार पडली आहे. ते म्हणाले की,52 दिवस चाललेल्या यावर्षीच्या पवित्र यात्रेदरम्यान, गेल्या 12 वर्षांतील सर्वाधिक म्हणजे 5.12 लाखांहून अधिक भाविकांनी पवित्र गुहेला भेट दिली. ही यात्रा यशस्वी केल्याबद्दल सर्व सुरक्षा कर्मचारी, श्री अमरनाथजी श्राइन बोर्ड, जम्मू-काश्मीर प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थांचे त्यांनी अभिनंदन केले. यात्रेकरूंसाठी यात्रा सुरक्षित आणि सुरळीत पार पाडण्यात सर्वांनी अनन्यसाधारण योगदान दिल्याचे त्यांनी नमूद केले. बाबांचे आशीर्वाद सर्वांवर कायम राहोत अशी प्रार्थना करत ते म्हणाले,जय बाबा बर्फानी!
S.Kane/V.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2047443)
आगंतुक पटल : 83