वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
भारतातील इलेक्ट्रिक वाहनांसारख्या क्षेत्रांसाठी आवश्यक असलेल्या महत्त्वाच्या खनिजांची गरज आफ्रिका पूर्ण करू शकतो: केंद्रीय मंत्री पीयूष गोयल
Posted On:
21 AUG 2024 7:17PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 ऑगस्ट 2024
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी म्हटले आहे की, भारतातील ईव्हीज म्हणजेच विजेवर चालणाऱ्या वाहनांसारख्या काही क्षेत्रांसाठी आवश्यक असलेल्या महत्त्वाच्या खनिजांची गरज आफ्रिका पूर्ण करू शकतो. नवी दिल्ली येथे आयोजित 19व्या सीआयआय भारत आफ्रिका व्यापार परिषदेतील विशेष सत्रात उपस्थित व्यापार मंत्र्यांना ते आज संबोधित करत होते.
आफ्रिका हा देश खनिजांच्या बाबतीत समृद्ध असल्यामुळे खनन क्षेत्रात या दोन्ही देशांच्या सहयोगी संबंधांसाठीच्या शक्यता गोयल यांनी अधोरेखित केल्या.भारत आणि आफ्रिका या दोन्ही देशांमध्ये संयुक्त भागीदारीच्या माध्यमातून होणाऱ्या शाश्वत खनन प्रक्रियांवर आणि खनिजांच्या मूल्यवर्धनावर त्यांनी अधिक भर दिला.
येत्या सात वर्षांत भारत आणि आफ्रिका या देशांदरम्यान होणारा व्यापार दुप्पट करण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट केंद्रीय मंत्री गोयल यांनी सर्वांपुढे ठेवले. भारत आणि आफ्रिकी देश यांच्यादरम्यान व्यापाराची प्रचंड क्षमता आहे याकडे त्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले. अत्यंत कमी प्रमाणात विकसित देशांकरिता भारताने सुरु केलेल्या सीमाशुल्क -मुक्त प्राधान्य (डीएफटीपी) योजनेत आफ्रिका खंडातील 33 देश अजूनही सहभागी झालेले नाहीत याकडे निर्देश करत केंद्रीय मंत्र्यांनी या देशांना सदर योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
कृषी, औषधनिर्मिती, वस्त्रोद्योग, वाहन निर्मिती तसेच नवीकरणीय उर्जा या क्षेत्रातील भारताचे सामर्थ्य आफ्रिकेच्या विकासविषयक गरजांशी सुसंगत आहे यावर केंद्रीय मंत्र्यांनी अधिक भर दिला.त्याचप्रमाणे खनन, पर्यटन, कृषी उत्पादने आणि उत्पादित वस्तू यांच्या बाबतीत आफ्रिकेची ताकद भारताच्या विकासविषयक गरजांना पूरक असल्याचे निरीक्षण देखील त्यांनी नोंदवले. म्हणूनच न्याय्य व्यापारावर लक्ष केंद्रित केले पाहिजे असे ते म्हणाले.
अन्न सुरक्षेचा मुद्दा सर्वांसमोर मांडताना, केंद्रीय मंत्री गोयल यांनी सांगितले की आफ्रिकेच्या कृषी क्षेत्रात भारत लक्षणीय योगदान देऊ शकतो. भारतात तेलबिया, डाळी आणि इतर पिकांना असलेल्या वाढत्या मागणीचा उल्लेख करून त्यांनी भारताला निर्यात करण्यासाठी आफ्रिकेतील लागवड क्षेत्रात सहयोगाचा प्रस्ताव मांडला.
भारत आणि आफ्रिका या दोन्ही देशांतील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) क्षेत्राच्या महत्त्वपूर्ण भूमिका लक्षात घेत केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी अधिक रोजगार निर्मितीसाठी वाढीव सहकार्य, एमएसएमई उद्योगांना पाठबळ देऊन उद्योजकतेची जोपासना करण्याचे आवाहन उपस्थितांना केले.
S.Kane/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2047395)
Visitor Counter : 67