वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

ई-कॉमर्सची वाढ ही नागरिक केंद्रित असावी: केंद्रीय मंत्री पीयूष गोयल

Posted On: 21 AUG 2024 3:12PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 21 ऑगस्ट 2024

ई-कॉमर्सची वाढ नागरिक केंद्रित असेल याची काळजी घेण्याचे आवाहन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी केले. पहल इंडिया फाऊंडेशनच्या 'भारतातील रोजगार आणि ग्राहक कल्याणावर ई-कॉमर्सचा  प्रभाव' या अहवालाच्या प्रकाशनाला आज नवी दिल्ली येथे प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित होते. ते म्हणाले की, ई-कॉमर्सच्या वाढीसाठी समाजाच्या मोठ्या वर्गात लाभ वितरणाचे लोकशाहीकरण करणे आवश्यक आहे.

तंत्रज्ञान हे सक्षम बनवण्याचे, अभिनवता आणण्याचे आणि ग्राहकांच्या गरजा काहीवेळा अधिक कार्यक्षमतेने पूर्ण करण्याचे साधन आहे. परंतु ही वाढ सुव्यवस्थित पद्धतीने झाली पाहिजे, असे नमूद करताना गोयल म्हणाले की, बाजारपेठेतील हिस्सा मिळविण्याच्या शर्यतीत आपण देशभरातील 100 दशलक्ष छोट्या  किरकोळ विक्रेत्यांसाठी अडथळा ठरू नये.

भारताच्या विकसनशील अर्थव्यवस्थेचे संरक्षण करणे आणि ज्यांना अजूनही सकारात्मक कारवाईची गरज आहे त्यांना पाठिंबा देण्याचे महत्त्व गोयल यांनी अधोरेखित केले.

गोयल यांनी भारताच्या पारंपरिक किरकोळ क्षेत्रावरील ई-कॉमर्सचा वाढता प्रभाव आणि त्याचा रोजगारावर होणाऱ्या संभाव्य परिणामाबाबत चिंता व्यक्त केली. पुढील दशकात भारतातील निम्मी बाजारपेठ ई-कॉमर्स नेटवर्कचा भाग बनेल अशी शक्यता व्यक्त करत  हा विकास "चिंतेची बाब"असल्याचे त्यांनी नमूद केले.

ई-कॉमर्सच्या व्यापक परिणामांची दखल घेत त्याच्या प्रभावाचे निःपक्षपाती आणि डेटा-चालित विश्लेषण करण्याचे आवाहन गोयल यांनी केले. पाश्चात्य देशांशी तुलना करताना, गोयल यांनी ई-कॉमर्सच्या वाढीमुळे अमेरिका आणि युरोप सारख्या देशांमध्ये पारंपरिक छोट्या खासगी  दुकानांची संख्या घटल्याचे  नमूद केले. स्वित्झर्लंडचा ई-कॉमर्सबाबत सावध दृष्टिकोन असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

ई-कॉमर्सचा स्थानिक व्यवसाय आणि रोजगारावर, विशेषत: फार्मसी आणि मोबाइल फोन दुरुस्तीच्या दुकानांसारख्या क्षेत्रांवर होणाऱ्या परिणामाबद्दल मंत्र्यांनी चिंता व्यक्त केली.


S.Kane/V.Joshi/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(Release ID: 2047272) Visitor Counter : 74