शिक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनात देशभरातील विविध शाळांमधील मुलांसोबत रक्षाबंधनाचा सण केला साजरा

Posted On: 19 AUG 2024 8:28PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 19 ऑगस्ट 2024

 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज राष्ट्रपती भवनात देशभरातील विविध शाळांमधील  विद्यार्थ्यांसोबत रक्षाबंधनाचा सण साजरा केला.

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि शिक्षण राज्यमंत्री,  कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार ) जयंत चौधरी या कार्यक्रमाला उपस्थित होते.  शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाचे सचिव संजय कुमार आणि शिक्षण मंत्रालयाचे इतर अधिकारी देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.

   

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी विद्यार्थ्यांना आशीर्वाद दिला आणि मार्गदर्शन केले.  त्यासाठी तसेच हे रक्षाबंधन मुलांसाठी खास बनवले याबद्दल धर्मेंद्र प्रधान यांनी राष्ट्रपतींचे आभार मानले. त्यानंतर  अनौपचारिक संवाद साधताना  त्यांनी विद्यार्थ्यांची ध्येये आणि आकांक्षा याबाबत जाणून घेतले.

16 राज्यांमधील सरकारी शाळांमधील 180 हून अधिक विद्यार्थ्यांनी आज राष्ट्रपतींची भेट घेतली. भारताच्या समृद्ध स्थापत्य आणि बागायती वारशाचा दाखला  असलेल्या राष्ट्रपती भवनाच्या आतील  अमृत उद्यानाला दिलेल्या भेटीमुळे विद्यार्थ्यांना समृद्ध अनुभव घेता आला. राष्ट्रपतींशी संवाद साधण्याची ही विलक्षण संधी विद्यार्थ्यांसाठी एक अविस्मरणीय अनुभव होता. त्यातून  त्यांच्यामध्ये देशाच्या सांस्कृतिक परंपरांबद्दल अभिमान आणि आदराची भावना बिंबवली गेली. 

2024-08-19 19:02:39.554000  

 

* * *

S.Kakade/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2046765) Visitor Counter : 56