भूविज्ञान मंत्रालय
सतराव्या आंतरराष्ट्रीय पृथ्वी विज्ञान ऑलिंपियाड मध्ये भारताची चमकदार कामगिरी
Posted On:
17 AUG 2024 11:02AM by PIB Mumbai
चीनमध्ये बीजिंग येथे 08-16 ऑगस्ट 2024 दरम्यान झालेल्या सतराव्या आंतरराष्ट्रीय पृथ्वी विज्ञान ऑलिंपियाड मध्ये भारतीय विद्यार्थ्यांच्या संघाने अनेक प्रतिष्ठित पदके प्राप्त केली. चार सदस्यीय भारतीय संघामध्ये गुजरात, केरळ, छत्तीसगड आणि राजस्थानमधील विद्यार्थ्यांचा समावेश होता. या विद्यार्थ्यांनी तीन स्पर्धा श्रेणींमध्ये (लेखी आणि प्रात्यक्षिक, पृथ्वी प्रणाली प्रकल्प आणि आंतरराष्ट्रीय टीम फील्ड इन्व्हेस्टिगेशन) प्रत्येकी तीन सुवर्ण आणि कांस्य आणि दोन रौप्य पदके जिंकली आहेत.
पृथ्वी विज्ञान मंत्रालय आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय, राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), पंतप्रधान कार्यालय, अणुऊर्जा विभाग, अंतराळ विभाग, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्तीवेतन राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंग, यांनी भारतीय संघाचे अभिनंदन केले आणि शैक्षणिक क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेचे वैभव देशाला मिळवून दिल्याबद्दल विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
पृथ्वी विज्ञान मंत्रालयाअंतर्गत REACHOUT (संशोधन, शिक्षण, प्रशिक्षण आणि आउटरीच) योजनेनुसार विद्यार्थी केंद्रित उपक्रमांपैकी आंतरराष्ट्रीय पृथ्वी विज्ञान ऑलिंपियाड हा एक अतिशय यशस्वी उपक्रम आहे. आम्हाला पृथ्वी विज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आणि यश मिळविणाऱ्या युवावर्गाचा अभिमान आहे”, अशा शब्दात भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे (MoES) सचिव डॉ एम रविचंद्रन, यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले.
***
S.Tupe/B.Sontakke/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2046260)
Visitor Counter : 96