नागरी उड्डाण मंत्रालय

पश्चिम बंगालच्या बागडोगरा विमानतळावर 1549 कोटी रुपये खर्चून नवीन सिव्हिल एन्क्लेव्ह विकसित करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

Posted On: 16 AUG 2024 9:33PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 16 ऑगस्ट 2024

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार विषयक  मंत्रिमंडळ समितीने पश्चिम बंगालमधील सिलीगुडी येथील बागडोगरा विमानतळावर नवीन सिव्हिल एन्क्लेव्ह विकसित करण्याच्या भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. यासाठी 1549 कोटी रुपये खर्च येणार आहे.

प्रस्तावित टर्मिनल इमारतीचा परिसर 70,390 चौरस मीटर इतका असून वार्षिक  1 कोटी प्रवाशांना हाताळण्याची  क्षमता तर गर्दीच्या वेळी  3000 प्रवाशांना  सामावून घेण्याच्या दृष्टीने याची रचना  केली आहे. प्रकल्पाच्या प्रमुख घटकांमध्ये A-321 प्रकारच्या विमानांसाठी योग्य 10 पार्किंग बे, तसेच दोन लिंक टॅक्सीवे आणि बहुस्तरीय  कार पार्किंग साठी सक्षम ऍप्रनचे बांधकाम समाविष्ट आहे. पर्यावरणीय जबाबदारी लक्षात घेऊन  टर्मिनल इमारत ही हरित  इमारत असेल, ज्यात नवीकरणीय  ऊर्जा स्त्रोतांचे एकत्रीकरण आणि नैसर्गिक संसाधनांवरील अवलंबत्व  कमी करण्यासाठी नैसर्गिक प्रकाशाचा अधिकाधिक वापर असेल.

या विकासकामामुळे  बागडोगरा विमानतळाची कार्यान्वयन क्षमता आणि प्रवाशांचा अनुभव द्विगुणित होईल आणि  या प्रदेशासाठी एक प्रमुख विमान प्रवास केंद्र म्हणून त्याची भूमिका अधिक मजबूत होईल.

N.Chitale/S.Kane/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 



(Release ID: 2046154) Visitor Counter : 11


Read this release in: English , Urdu , Hindi , Gujarati