पंचायती राज मंत्रालय
भारताच्या विकास यात्रेत पंचायत प्रतिनिधींच्या महत्त्वाच्या भूमिकेची नोंद घेत, 78 व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी विशेष अतिथी म्हणून आमंत्रित केलेल्या पंचायत प्रतिनिधींचा केंद्रीय मंत्री राजीव रंजन सिंह यांच्या हस्ते सत्कार
तुमच्या कार्याच्या आधारावर तुम्ही तुमची ओळख निर्माण करा: केंद्रीय मंत्री राजीव रंजन सिंह
Posted On:
15 AUG 2024 5:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 ऑगस्ट 2024
भारताच्या 78 व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला नवी दिल्ली येथील जनपथावरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात आयोजित करण्यात आलेल्या भव्य समारंभात केंद्रीय पंचायत राज आणि मत्स्यव्यवसाय, पशुपालन आणि दुग्धव्यवसाय मंत्री राजीव रंजन सिंह उर्फ लालन सिंह यांनी पंचायती राज संस्था (पीआरआयएस) तसेच ग्रामीण स्थानिक संस्था (आरएलबीएस) यांमध्ये निर्वाचित महिला प्रतिनिधी आणि निर्वाचित प्रतिनिधी यांना ग्रामीण भारतात शाश्वत विकास ध्येये (एसडीजीज) साध्य करण्यात आघाडी घेण्याची सूचना केली.
स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी विशेष अतिथी म्हणून आमंत्रित केलेल्या निर्वाचित महिला प्रतिनिधी (EWRs)आणि निर्वाचित प्रतिनिधी (ERs) यांचा सत्कार करण्यासाठी केंद्रीय पंचायती राज मंत्रालयाने काल सत्कार समारंभाचे आयोजन केले होते. नवी दिल्ली येथील जनपथावरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात हा कार्यक्रम संपन्न झाला.
सक्षमीकरण आणि मान्यता यांच्या उर्जेसह आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात देशभरातील पंचायत संस्थांमध्ये कार्यरत असामान्य महिला नेत्यांचा सन्मान करण्यात आला. या महिलांनी समाजाला दिलेल्या अतुलनीय योगदानामुळे त्यांचे समुदाय आणि मतदारसंघांना अभिमान आणि प्रगती मिळवून दिली. देशभरातील पंचायती राज संस्थांमधून (PRIs) सुमारे 400 निर्वाचित महिला प्रतिनिधी (EWRs)आणि निर्वाचित प्रतिनिधी (ERs) विशेष अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. भारताच्या विकास यात्रेत या विशेष अतिथींनी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाची केंद्रीय पंचायती राज मंत्री राजीव रंजन सिंह यांनी या कार्यक्रमात नोंद घेतली.
यावेळी केलेल्या बीजभाषणात, केंद्रीय पंचायती राज मंत्री राजीव रंजन सिंह यांनी महिलांकडे असलेली अंगभूत शक्ती आणि क्षमता याकडे सर्वांचे लक्ष वेधत महिलांच्या समाजातील महत्त्वावर अधिक भर दिला. ग्रामीण भागातील प्रशासन आणि सरकारी सेवावितरण यांच्यात सुधारणा घडवून आणण्यासाठी तंत्रज्ञानविषयक प्रगतीचा विशेषतः ई-ग्राम स्वराज भाषिणी सारख्या मंचाच्या समावेशाचा संपूर्ण फायदा करून घेण्याचा आग्रह त्यांनी उपस्थित महिला नेत्यांकडे व्यक्त केला. कृती आणि प्रभाव यामध्ये नेतृत्वाचे खरे सार आहे ही बाब अधोरेखित करत त्यांनी प्रतिनिधींना सांगितले, “तुमच्या कार्याच्या आधारावर तुम्ही तुमची ओळख निर्माण करा.”
पंचायत संस्थांमधील प्रतिनिधींना स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी दिल्लीला येण्याचे आमंत्रण देण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी निर्णयाची देखील केंद्रीय मंत्री राजीव रंजन सिंह यांनी प्रशंसा केली. विकसित भारत घडवण्याच्या निर्धारात पंचायतींकडे असलेली मध्यवर्ती भूमिका देखील त्यांनी ठळकपणे मांडली. केंद्रीय पंचायती राज मंत्रालयातर्फे आयोजित कठोर प्रशिक्षण आणि क्षमता निर्मितीविषयक उपक्रमांबद्दल केंद्रीय मंत्र्यांनी प्रशंसोद्गार काढले. या उपक्रमांनी पंचायत नेत्यांना परिणामकारक प्रशासनासाठी आवश्यक प्रशासकीय आणि तांत्रिक कौशल्यांसह सक्षम केले आहे.
* * *
S.Patil/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2045680)
Visitor Counter : 46