गृह मंत्रालय
भारताच्या 78व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण म्हणजे विकसित आणि आत्मनिर्भर भारत निर्माण करण्याच्या सरकारच्या संकल्पाचे प्रतिबिंब - केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा
Posted On:
15 AUG 2024 2:23PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 ऑगस्ट 2024
"78व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण हे विकसित आणि स्वावलंबी भारत निर्माण करण्याच्या सरकारच्या संकल्पाचे प्रतिबिंब आहे. नवीकरणीय ऊर्जा, एक राष्ट्र - एक निवडणूक, समान नागरी कायदा, वैद्यकीय शिक्षणाचा विस्तार, औद्योगिक उत्पादन आणि 'डिझाइन इन इंडिया' आणि बचत गटांद्वारे महिला सक्षमीकरण यातून स्वावलंबी बनवणाऱ्या संकल्पना अधोरेखित करणाऱ्या पंतप्रधानांच्या भाषणातून गेल्या दहा वर्षात मिळाल्या मिळालेल्या यशापासून प्रेरित होऊन देशाला आणखी पुढे नेण्याची त्यांची वचनबद्धता दिसून येते. सर्व देश बांधवांनी हे संबोधन ऐकून सशक्त भारत निर्माण करण्याची शपथ घ्यावी, असे आवाहन मी करतो,” असे अमित शहा यांनी X या समाज माध्यमावरील आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
“पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांचे भाषण केवळ क्षितिजावरील उज्ज्वल भविष्याचे विहंगम दृश्यच दाखवत नाही, तर ते उद्दिष्ट आपण साध्य करू शकतो, असा अढळ विश्वासही प्रत्येक भारतीयाच्या मनात निर्माण करते. गेल्या 10 वर्षांमध्ये, भारताने विविध सुधारणांद्वारे आत्म-परिवर्तनाचा प्रवास सफल आहे. हा एक नवा भारत आहे ज्यात नागरिक-चालित प्रशासन आहे. देशातील 140 कोटी नागरिक नक्कीच महानता, समृद्धी आणि प्रगती प्राप्त करु शकतात, असा ठाम विश्वास असणारा हा नवा भारत आहे”, असेही केंद्रीय गृहमंत्र्यांनी म्हटले आहे.
* * *
S.Nilkanth/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2045598)
Visitor Counter : 67