मत्स्योत्पादन, पशुविकास आणि दुग्धविकास मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

तळाच्या स्तरापर्यंत सर्वसमावेशक प्रशिक्षण आणि क्षमता उभारणीची गरज प्रा. एस. पी. सिंह बघेल यांच्याकडून व्यक्त


पशुसंवर्धन आणि दुग्धविकास विभागाकडून 21व्या पशुधन शिरगणतीबाबत सॉफ्टवेअर आणि प्रजातींविषयी केरळ आणि गोव्याच्या राज्य आणि जिल्हा नोडल अधिकाऱ्यांसाठी प्रादेशिक प्रशिक्षणाचे आयोजन

Posted On: 13 AUG 2024 7:22PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 13 ऑगस्ट 2024

 

भारत सरकारच्या मत्स्यपालन, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्रालयाच्या पशुसंवर्धन आणि दुग्धविकास विभागाने (DAHD), आणि यजमान राज्य गोवा यांनी 21व्या पशुधन शिरगणतीबाबत सॉफ्टवेअर (मोबाइल आणि वेब ऍप्लिकेशन/डॅशबोर्ड) आणि प्रजातींविषयी केरळ आणि गोव्याच्या राज्य आणि जिल्हा नोडल अधिकाऱ्यांसाठी प्रादेशिक प्रशिक्षणाचे आयोजन केले.

A group of men standing around a table with a plate of food  Description automatically generated

सप्टेंबर-डिसेंबर 2024 दरम्यान नियोजित असलेली 21 वी पशुधन शिरगणती करण्यासाठी या राज्यांच्या राज्य/जिल्हा नोडल अधिकाऱ्यांना नव्याने सुरू केलेल्या मोबाईल आणि वेब ऍप्लिकेशन्सवर प्रशिक्षण देण्यासाठी आज गोव्यामध्ये पणजी येथे कार्यशाळा आयोजित करण्यात आली.

मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाचे राज्यमंत्री प्रा. एस.पी. सिंह बघेल यांनी भारत सरकारच्या पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागाचे  सांख्यिकी सल्लागार जगत हजारिका, गोवा सरकारचे पशुसंवर्धन आणि पशु सेवा सचिव अरुण कुमार मिश्रा,  आणि गोवा सरकारचे एएचडी संचालक डॉ. नितीन नाईक  यांच्या उपस्थितीत या कार्यशाळेचे उद्घाटन केले. प्रो. एस पी सिंह  बघेल यांनी या कार्यशाळेमध्ये मार्गदर्शन केले आणि तळागाळाच्या स्तरापर्यंत सर्वसमावेशक प्रशिक्षण आणि क्षमता निर्माण करण्याची गरज अधोरेखित केली. भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी आणि अन्नसुरक्षेसाठी पशुधन क्षेत्राचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. संकलित केलेली आकडेवारी आणि संबंधित माहिती (डेटा) भविष्यातील उपक्रमांना आकार देण्यासाठी आणि क्षेत्रातील आव्हानांना तोंड देण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल यावर भर देत, त्यांनी पशुंच्या शिरगणतीचे काटेकोरपणे नियोजन आणि अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले.

जगत हजारिका यांनी आपल्या भाषणात या कार्यशाळेचे महत्त्व अधोरेखित केले, त्यांनी 21 व्या पशुधन गणनेचे यश सुनिश्चित करण्यासाठी सर्व हितधारकांच्या सामूहिक जबाबदारीवर भर दिला, जी पशुसंवर्धन क्षेत्राची भविष्यातील धोरणे आणि कार्यक्रम तयार करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल आणि ही पशुधन शिरगणती यशस्वी होण्यासाठी त्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

आपल्या भाषणात अरुण कुमार मिश्रा यांनी पशुधन क्षेत्रात शाश्वत पद्धतींच्या एकात्मिकरणावर भर दिला.

   

भारतभरातील दूध उत्पादनातील सर्वोत्तम पद्धतींचा अवलंब गोवा सरकारने केला असल्याकडे डॉ. नितीन नाईक यांनी लक्ष वेधले आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणात पशुधन कशा प्रकारे योगदान देते, त्यांच्या रोखीच्या गरजा प्रभावीपणे कशा पूर्ण करते हे स्पष्ट केले.

या कार्यशाळेत भारत सरकारच्या पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागाच्या सॉफ्टवेअर टीमद्वारे 21 व्या पशुधन गणनेसाठी सॉफ्टवेअरच्या पद्धती आणि त्यांच्या प्रत्यक्ष वापराच्या तपशीलवार सत्रांचा समावेश होता. राज्य आणि जिल्हा नोडल अधिकाऱ्यांना मोबाईल ऍप्लिकेशन आणि डॅशबोर्ड सॉफ्टवेअरवर प्रशिक्षित करण्यात आले. हे नोडल अधिकारी त्यांच्या संबंधित जिल्हा मुख्यालयात प्रगणकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करतील.

   

 

* * *

N.Chitale/S.Patil/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai




(Release ID: 2044971) Visitor Counter : 27