मत्स्योत्पादन, पशुविकास आणि दुग्धविकास मंत्रालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

भारत सरकारच्या पशुविकास आणि दुग्धविकास विभागाच्या संयुक्त विद्यमाने संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेद्वारे मानक पशुवैद्यकीय उपचार मार्गदर्शक तत्वांचे निश्चितीकरण याविषयी नवी दिल्लीत दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन

Posted On: 12 AUG 2024 8:35PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 12 ऑगस्ट 2024

 

संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेने (एफएओ) भारत सरकारच्या पशुविकास आणि दुग्धविकास विभागाच्या (डीएएचडी) संयुक्त विद्यमाने मानक पशुवैद्यकीय उपचार मार्गदर्शक तत्त्वांना अंतिम करणे या विषयावर 8 आणि 9 ऑगस्ट 2024 रोजी दोन दिवसीय कार्यशाळा आयोजित केली होती. या ऐतिहासिक कार्यक्रमाने आयसीएआर पशु विज्ञान संस्था, पशुवैद्यकीय विद्यापीठे, आयएनएफएएच सारख्या खाजगी क्षेत्रातील संस्था, एफएओ, यूएसएआयडी, आणि जेएचपीआयईजीओ आणि डीएएचडी सारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांच्या प्रतिनिधींसह पशुवैद्यकीय आणि पशु आरोग्य क्षेत्रातील 78 प्रमुख हितधारकांना एकत्र आणले. देशभरातील पशुवैद्यकीय पद्धतींचे प्रमाणीकरण करणारी मार्गदर्शक तत्त्वे एकत्रितपणे विकसित करणे हा या कार्यशाळेचा मूलभूत उद्देश होता.

पशुविकास आणि दुग्धविकास विभागाच्या सचिव अलका उपाध्याय यांनी 9 ऑगस्ट 2024 रोजी समारोप सत्रात सहभाग घेतला. त्यांनी उपजीविकेला पूरक तसेच अन्न सुरक्षा आणि संवर्धन याची खातरजमा करण्यात पशुसंवर्धन क्षेत्राची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित केली. भारतातच दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचे मूल्य 12 लाख कोटी रुपयांहून अधिक आहे. कृषी आणि इतर संलग्न क्षेत्रांच्या तुलनेत हे क्षेत्र खूप वेगाने वाढत असल्याने, भारताला त्याच्या मोठ्या पशुधन आणि कुक्कुट गणनेत संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य रोग अशा दोन्ही प्रकारच्या वारंवार घटनांना सामोरे जावे लागते. प्रभावी व्यवस्थापनाच्या अभावी, या रोगांद्वारे समुदायाच्या उपजीविकेवर महत्त्वपूर्ण आणि अप्रत्यक्ष नकारात्मक परिणाम होऊ शकतात. केवळ काही विकसनशील देशांमध्ये मानक पशुवैद्यकीय उपचार मार्गदर्शक तत्त्वे आहेत हे लक्षात घेता, भारतासाठी एसव्हीटीजी तयार करणे हा एक महत्त्वाचा उपक्रम आहे. देशभरातील विविध रोगांसाठी सातत्यपूर्ण उपचार मार्गदर्शक तत्त्वे तयार करणे हा या प्रयत्नाचा उद्देश आहे. उपाध्याय यांनी एसव्हीटीजी चा मसुदा तयार करण्यात सहभागी सर्व तज्ज्ञांच्या प्रयत्नांचे कौतुक करून कार्यशाळेच्या समन्वय आणि आयोजनात एफएओ आणि यूएसएआयडी चे योगदान नमूद केले. त्यांनी सामान्य पशुधन आजारांसाठी वांशिक-पशुवैद्यकीय पद्धती विकसित करण्याच्या राष्ट्रीय डेअरी विकास मंडळाच्या (एनडीडीबी) उपक्रमांची प्रशंसा केली आणि आरोग्य आणि पशुधन उत्पादनाच्या विस्तारासाठी विभागाद्वारे प्रशिक्षित केलेल्या मान्यताप्राप्त एजंट (एएचईएलपी) द्वारे त्यांचा प्रचार करण्यास सुचवले. हा दृष्टीकोन प्रतिजैविक प्रतिकाराशी संबंधित जोखीम कमी करण्यासाठी महत्त्वपूर्ण अशा प्रतिजैविकांच्या पर्यायांना प्रोत्साहन देईल.

पशुविकास आणि दुग्धविकास विभागाचे पशुविकास आयुक्त डॉ. अभिजित मित्रा यांनी 8 ऑगस्ट 2024 रोजी कार्यशाळेचे उद्घाटन केले. डॉ. मित्रा यांनी भारतातील एएमआर प्रतिबंधासाठी विभागाने घेतलेल्या पुढाकारांवर प्रकाश टाकला आणि ही मार्गदर्शक तत्त्वे एएमआर वरील राष्ट्रीय कृती आराखड्याचेही समर्थन करणारी असल्याचे निदर्शनास आणले.

 

* * *

S.Patil/V.Joshi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2044695) Visitor Counter : 29