वस्त्रोद्योग मंत्रालय
हातमाग पंधरवडा सोहळ्यानिमित्त वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांनी गांधीनगरमधील एनआयएफटी ला दिली भेट
Posted On:
12 AUG 2024 6:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 ऑगस्ट 2024
केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांनी 10 ऑगस्ट, 2024 रोजी गांधीनगर येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी (NIFT) ला भेट दिली आणि त्यांनी हातमाग पंधरवडा उत्सवात सक्रीय सहभाग घेतला. भेटीदरम्यान, मंत्री महोदयांनी या भेटीत भारतीय कापडाचा अतुलनीय वारसा दर्शविणाऱ्या चैतन्यमयी आणि काळजीपूर्वक जतन केलेल्या हातमागावर तयार कापडाच्या प्रदर्शनाचे उद्घाटन केले.
प्रदर्शनानंतर गिरीराज सिंह यांनी गांधीनगरमधील एनआयएफटीचे विद्यार्थी आणि प्राध्यापकांशी अभ्यासपूर्ण आणि अर्थपूर्ण चर्चा केली. या परस्परसंवादांमुळे या संस्थेत उपलब्ध असलेले नाविन्यपूर्ण उपक्रम आणि भविष्याचा विचार करून तयार करण्यात आलेल्या अभ्यासक्रमाबाबत खोलवर जाणून घेण्याची संधी मिळाली.
गिरीराज सिंह हे भारतीय कापड उद्योगाच्या भविष्याबाबत आशावादी होते. निरंतर नवोन्मेष, वचनबद्धता आणि डिझाइन, एनआयएफटीचे व्यवस्थापन आणि तांत्रिक उपाययोजना यामुळे हातमाग उद्योग क्षेत्राच्या समृद्ध परंपरांची आगामी वर्षांत भरभराट होईल आणि त्या आणखी विकसित होत राहतील.
गांधीनगरमधील एनआयएफटी येथील संपूर्ण हातमाग पंधरवडा सोहळा एक जबरदस्त यशस्वी आयोजन ठरला. हा पंधरवडा भारतीय वस्त्रोद्योगाला चालना देण्यासाठी संस्थेच्या अटल समर्पणाचा दाखला होता. या कार्यक्रमाने वस्त्रोद्योगाच्या अतुलनीय क्षमतांवर प्रकाश टाकला. या क्षेत्राचे संवर्धन आणि प्रचार करण्यात एनआयएफटी सारख्या संस्थांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे, यावरही या कार्यक्रमाने प्रकाश टाकला.
* * *
S.Patil/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2044634)
Visitor Counter : 49