संरक्षण मंत्रालय

डीआरडीओ द्वारे विकसित लाइट बुलेट-प्रूफ जॅकेट

Posted On: 09 AUG 2024 3:08PM by PIB Mumbai

 

संरक्षण संशोधन  आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) सर्वात हलके फ्रंट हार्ड आर्मर पॅनेल (एफएचएपी) असलेले बुलेट प्रूफ जॅकेट विकसित केले आहे. हे जॅकेट दोन प्रकारात म्हणजेच एफएचएपीच्या वेगवेगळ्या क्षेत्रीय घनतेसह इन-कन्जक्शन-विथ (आयसीडबल्यू) आणि स्टँडअलोन असे विकसित केले  आहे. तंत्रज्ञान हस्तांतरण (टीओटी) धोरण आणि उत्पादनाच्या डीआरडीओच्या प्रक्रियेनुसार विकसित तंत्रज्ञान भारतीय उद्योगांना हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

हे जॅकेट अभिनव डिझाइन दृष्टिकोनावर आधारित आहे, जिथे नवीन प्रक्रियांसह नाविन्यपूर्ण सामग्री सुद्धा वापरली आहे. हे जॅकेट बीआयएस मानक 17051 नुसार आहे  आणि म्हणून, ते स्तर 6 चे अंदाजे सर्वात हलके जॅकेट आहे ज्याचे वजन  मध्यम आकारासाठी 10.1 किलो असून कारवाई दरम्यान घालण्यास उत्तम आणि आरामदायी आहे. याबरोबरच या जॅकेटमध्ये इतर संबंधित वैशिष्ट्यांसह क्विक रिलीज मेकॅनिझम (क्यूआरएम) देखील आहे. हे जॅकेट  भारतीय सशस्त्र दल / सीएपीएफच्या सैनिकांचे  7.62×54 आर एपी/ एपीआय राऊंडच्या  संभाव्य धोक्यापासून संरक्षण करेल.

संरक्षण  राज्यमंत्री संजय सेठ यांनी आज लोकसभेत सी.एम. रमेश यांना दिलेल्या लेखी उत्तरात  ही माहिती दिली.

***

S.Kane/G.Deoda/P.Kor

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2043703) Visitor Counter : 18


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil