भारतीय स्पर्धा आयोग
भारतीय स्पर्धा आयोगाद्वारे एटीसी टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि चे 100% भाग भांडवल डेटा इन्फ्रास्ट्रक्चर ट्रस्ट आणि काही आंतर-संलग्न व्यवहारांद्वारे संपादन करण्यास मान्यता
Posted On:
07 AUG 2024 10:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 ऑगस्ट 2024
भारताच्या स्पर्धा आयोगाने (सीसीआय) डेटा इन्फ्रास्ट्रक्चर ट्रस्ट (डीआयटी) द्वारे एटीसी टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि (एटीसी इंडिया) च्या 100% भाग भांडवलाच्या प्रस्तावित संपादनास आणि काही आंतर-संलग्न व्यवहारांना मान्यता दिली आहे.
डीआयटी ही सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट) विनियम,2014अंतर्गत नोंदणीकृत इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट आहे. डीआयटी, तिच्या विशेष उद्देश वाहनांद्वारे, भारतात निष्क्रिय दूरसंचार पायाभूत सुविधांच्या तरतुदीच्या व्यवसायात गुंतलेली आहे.
एटीसी इंडिया ही अमेरिकन टॉवर इंटरनॅशनल,आयएनसी ची अप्रत्यक्ष उपकंपनी आहे.ती भारतात निष्क्रिय दूरसंचार पायाभूत सेवांच्या तरतुदीच्या व्यवसायात गुंतलेली आहे.
सीसीआय च्या तपशीलवार आदेशाचे पालन केले जाईल.
S.Patil/V.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2042904)
Visitor Counter : 68