सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय
ग्रामीण-शहरी लोकसंख्येचे आर्थिक सर्वेक्षण
Posted On:
07 AUG 2024 9:24PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 ऑगस्ट 2024
आर्थिक सर्वेक्षण 2023-24 मध्ये नमूद केल्यानुसार वर्ष 2030 पर्यंत भारतातील 40 टक्क्यांहून अधिक लोकसंख्या शहरी भागात राहील,असा अंदाज आहे. हा अंदाज नीती आयोगाच्या अभ्यास आणि अहवालांच्या आधारे काढण्यात आला आहे.
सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने जुलै 2020 ते जून 2021 या कालावधीत केलेल्या आवर्ती श्रम दल सर्वेक्षणामध्ये घरातील सदस्यांच्या स्थलांतर तपशीलांवर माहिती संकलित करण्यात आली आहे.देशांतर्गत ग्रामीण-शहरी स्थलांतर ओघाच्या चार प्रकारच्या अंतर्गत स्थलांतरितांची टक्केवारी ( ग्रामीण भागातून ग्रामीण भाग, ग्रामीण भागातून शहरी भाग, शहरी भागातून ग्रामीण भाग आणि शहरी भागातून शहरी भाग) पुढीलप्रमाणे :
All India
|
Rural to rural
|
Urban to rural
|
Rural to urban
|
Urban to urban
|
all
|
Person
|
55.0
|
10.2
|
18.9
|
15.9
|
100.0
|
ही माहिती सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार ) राव इंद्रजित सिंह यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात दिली.
S.Patil/S.Kakade/P.Malandkar
(Release ID: 2042901)
Visitor Counter : 92