ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्र्याच्या हस्ते मूल्य देखरेख प्रणाली (पीएमएस) या मोबाईल ॲपच्या व्हर्जन 4.0 चे उद्घाटन

Posted On: 01 AUG 2024 4:41PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 01 ऑगस्ट 2024


केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाने  मूल्य देखरेखअंतर्गत आणखी 16 जिन्नसांचा समावेश केला आहे अशी माहिती केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण तसेच नवीन आणि नवीकरणीय उर्जा मंत्री प्रल्हाद वेंकटेश जोशी यांनी दिली आहे. मूल्य देखरेख प्रणाली (पीएमएस) या मोबाईल ॲपच्या 4.0 च्या आवृत्तीचे उद्‌घाटन आज नवी दिल्ली येथे केल्यावर ते बोलत होते. दैनंदिन पातळीवर खाद्यान्नांच्या दरांवर  लक्ष ठेवण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या या प्रणालीमध्ये 22 प्रकारच्या जिन्नसांचा  यापूर्वीच समावेश करण्यात आला होता. आता  या प्रणालीद्वारे एकूण 38 जिन्नसांच्या किंमतींवर लक्ष ठेवता येईल.


 

 

देशभरातील 34 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांतील 550 केंद्रांच्या माध्यमातून ग्राहक व्यवहार विभाग दैनंदिन पातळीवर खाद्यान्नांच्या किंमतींचे निरीक्षण करत असतो. विभागाच्या निरीक्षणाअंती हाती आलेली किंमतविषयक आकडेवारी केंद्र सरकार,रिझर्व्ह बँक आणि विश्लेषकांना सीपीआय अर्थात ग्राहक किंमत निर्देशांच्या संदर्भात महागाईसंबंधी धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी उपयुक्त माहिती पुरवते.22 जिन्नसांच्या  26.5% सीपीआय भार च्या  तुलनेत आता 38 जिन्नसांचा एकूण सीपीआय भार  31% होणार आहे. नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या खाद्यान्नांमध्ये  बाजरी, ज्वारी, रागी, सूजी(गहू), मैदा (गहू), बेसन, तूप, लोणी, वांगी, अंडी, काळी मिरी, धने, जिरे, लाल मिरच्या, हळद पावडर आणि केळी यांचा समावेश आहे.  


 
दैनंदिन मूल्य देखरेख प्रणालीत समाविष्ट अन्न पदार्थांच्या प्रकारांमध्ये करण्यात आलेली वाढ अन्नपदार्थांच्या किंमतीत होणारे तीव्र चढउतार कमी करण्यासाठी तसेच एकंदर महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी धोरणात्मक उपाययोजना आखण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल. या उपक्रमातून ग्राहकांसाठी अत्यावश्यक अन्न पदार्थांची उपलब्धता तसेच किफायतशीर दर याबाबतच्या समस्या दूर करण्याप्रती केंद्र सरकारची वचनबद्धता दिसून येते.
 


या वर्षी (2024-25)खरीप हंगामातील डाळींच्या लागवड क्षेत्रात झालेल्या भरीव वाढीसह केंद्र सरकारने खाद्यान्नांच्या किंमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी केलेल्या उपाययोजना यामुळे बाजारात स्थैर्य आले असून गेल्या महिन्यात प्रमुख मंडयांमध्ये चणा, तूर तसेच उडीद यांचे भाव 4% नी उतरले आहेत.

 


S.Kane/S.Chitnis/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2040247) Visitor Counter : 80