श्रम आणि रोजगार मंत्रालय

कर्मचारी राज्य विमा महामंडळाने (ESIC) गेल्या दोन महिन्यांत केली 1221 डॉक्टरांची भर्ती.

Posted On: 31 JUL 2024 11:52AM by PIB Mumbai

चांगल्या वैद्यकीय सुविधा पुरवण्यासाठी कर्मचारी राज्य विमा महामंडळाने (ESIC) गेल्या दोन महिन्यांत विविध वैद्यकीय संवर्गांमध्ये 1221 डॉक्टरांच्या भरतीला मान्यता दिली आहे.  860 जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसर (GDMOs), 330 सहाय्यक प्राध्यापक आणि 31 तज्ञांची भरती करण्यात आली आहे.

शिवाय, परिचारिका सेवेतील 1930 रिक्त जागा भरण्यासाठी युपीएससी (UPSC) द्वारे परीक्षा आयोजित केली गेली असून लवकरच भरती प्रक्रिया पूर्ण केली जाईल.

ईएसआयसी ने 20 कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल) आणि 57 कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) ची भरती प्रक्रिया देखील पूर्ण केली आहे आणि युपीएससी च्या शिफारसीनुसार या महिन्यात नियुक्ती पत्रे जारी करण्यात आली आहेत.

कर्मचारी राज्य विमा योजना ही श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या कर्मचारी राज्य विमा कायदा, 1948 मध्ये समाविष्ट असलेल्या सामाजिक विम्याचा एकात्मिक उपाय आहे. ही योजना त्याच्या ईएसआय रुग्णालये आणि दवाखान्यांच्या विशाल जाळ्याद्वारे विमाधारक व्यक्तींना आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना रोख लाभ आणि वैद्यकीय सुविधांसह सामाजिक सुरक्षा फायद्यांचा संपूर्ण गुच्छ प्रदान करते.

***

JPS/SMukhedkar/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2039454) Visitor Counter : 53