गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

न्यायसहायक विज्ञान (फॉरेन्सिक) प्रयोगशाळा आणि पूरक पायाभूत सुविधा अद्ययावत करण्यासाठी केंद्र सरकारने उचललेली पाऊले

Posted On: 30 JUL 2024 7:30PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 30 जुलै 2024

देशात पुणे, चंदीगड, दिल्ली, भोपाळ, कोलकाता, गुवाहाटी आणि हैदराबाद येथे 7 केंद्रीय न्यायसहायक विज्ञान (फॉरेन्सिक सायन्सेस) प्रयोगशाळा (सीएफएसएल) आहेत.

देशातील न्यायसहायक विज्ञान परिसंस्थेसह तपास क्षमता आणि खटला चालवण्याची प्रक्रिया अधिक बळकट करण्यावर सरकारचा भर आहे. देशातील फॉरेन्सिक प्रयोगशाळा आणि संबंधित सुविधा अधिक कार्यक्षम करायची प्रक्रिया ही एक निरंतर आणि अविरत चालणारी प्रक्रिया आहे. तफावतीचे सातत्याने केलेले विश्लेषण आणि मागणीचे  मूल्यांकन यावर ही प्रक्रिया अवलंबून आहे.

देशात या प्रयोगशाळा आणि न्यायवैद्यक पायाभूत सुविधा अद्ययावत करण्यासाठी केंद्र सरकारने पुढील पावले उचलली आहेत:

  • भोपाळ, गुवाहाटी, पुणे आणि कोलकाता येथील प्रयोगशाळांचे आधुनिकीकरण.
  • केंद्रीय प्रयोगशाळांमध्ये अद्ययावत यंत्रसामग्री आणि उपकरणांचा वापर
  • देशातील 117 प्रयोगशाळांना (केंद्र आणि राज्य) जोडणारा ई-फोरेन्सिक माहिती तंत्रज्ञान मंच कार्यान्वित करणे.
  • देशाच्या सर्व भागात दर्जेदार आणि प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी 2020 मध्ये संसदेच्या कायद्यानुसार राष्ट्रीय न्यायसहायक विज्ञान विद्यापीठा (एनएफएसयु) ची स्थापना करण्यात आली आहे.एनएफएसयुने मणिपूरमध्ये इंफाळ आणि महाराष्ट्रात पुणे येथे प्रशिक्षण अकादमी सुरू केल्या आहेत.
  • देशातील न्यायवैद्यक चाचणी पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी आणि या क्षेत्रातील प्रलंबित प्रकरणांची संख्या कमी करण्याबरोबरच देशातील न्यायवैद्यक व्यावसायिकांची कमतरता दूर करण्यासाठी मंत्रिमंडळाने 19.06.2024 रोजी राष्ट्रीय न्यायसहायक पायाभूत सुविधा संवर्धन  योजनेला मंजुरी दिली आहे.
  • न्यायवैद्यक क्षमतांच्या आधुनिकीकरणासाठी एकूण 2080.5 कोटी रुपयांच्या आर्थिक खर्चासह योजनेला मंजुरी मिळाली आहे.

(xi) महिलांच्या सुरक्षेविषयीच्या योजनेअंतर्गत हैदराबादच्या राष्ट्रीय सायबर फॉरेन्सिक प्रयोगशाळेच्या धर्तीवर पुणे, चंदीगड, कोलकाता, भोपाळ, दिल्ली आणि गुवाहाटी येथील सहा सीएफएसएलमध्ये समर्पित सायबर फॉरेन्सिक विज्ञान प्रयोगशाळेची स्थापना करायला एकूण 126.84 कोटी रूपये मंजूर करण्यात आले आहेत.

Annexure

The State-wise details of forensic labs of the States / Union Territories.

S. No.

States / UTs

No. of State FSLs

No. of Regional FSLs

1

A&N Islands

1

0

2

Andhra Pradesh

1

5

3

Arunachal Pradesh

1

0

4

Assam

1

5

5

Bihar

1

2

6

Chhattisgarh

1

3

7

Delhi

1

1

8

Gujarat

1

6

9

Goa

1

0

10

Haryana

1

4

11

Himachal Pradesh

1

2

12

Jharkhand

1

0

13

J&K

1

0

14

Kerala

1

3

15

Karnataka

1

7

16

West Bengal

1

2

17

Madhya Pradesh

1

4

18

Maharashtra

1

13

19

Manipur

1

0

20

Meghalaya

1

0

21

Mizoram

1

0

22

Nagaland

1

0

23

Odisha

1

3

24

Puducherry

1

0

25

Punjab

1

3

26

Rajasthan

1

6

27

Sikkim

1

0

28

Tamil Nadu

1

10

29

Telangana

1

6

30

Tripura

1

0

31

Uttar Pradesh

1

11

32

Uttarakhand

1

1

 

Grand Total

32

97

(Source: Directorate of Forensic Science Services)

N.Chitale/P.Jambhekar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(Release ID: 2039271) Visitor Counter : 73