श्रम आणि रोजगार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कर्मचारी राज्य विमा योजनेअंतर्गत मे 2024 मध्ये 23.05 लाख नवीन कामगारांची नोंदणी झाली


यापैकी 11.15 लाख तरुण कर्मचाऱ्यांची नव्याने नोंदणी झाली असून ते 25 वर्षे वयोगटातील आहेत; तसेच ही संख्या एकूण नोंदणीच्या 48% पेक्षा जास्त आहे.

मे 2024 मध्ये 4.47 लाख महिला कर्मचारी आणि 60 पारलिंगी कर्मचाऱ्यांनी कर्मचारी राज्य विमा योजनेअंतर्गत नोंदणी केली

मे 2024 मध्ये कर्मचारी राज्य विमा योजनेअंतर्गत 20,110 नवीन आस्थापना नोंदणीकृत झाल्या

Posted On: 24 JUL 2024 3:10PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 24 जुलै 2024

 

कर्मचारी राज्य विमा योजनेच्या तात्पुरत्या वेतनश्रेणी माहितीपटावरून असे दिसून आले आहे की मे 2024 मध्ये 23.05 लाख नवीन कर्मचारी यात समाविष्ट झाले आहेत.

मे 2024 मध्ये 20,110 नवीन आस्थापना कर्मचारी राज्य विमा योजनेच्या सामाजिक सुरक्षा कक्षेत आणल्या गेल्या आहेत ज्यामुळे अधिकाधिक कामगारांना सामाजिक सुरक्षा योजनेचा लाभ मिळणे सुनिश्चित करता येईल.

प्रतिवर्ष विश्लेषणानुसार मे २०२३ च्या तुलनेत यातील निव्वळ नोंदणीमध्ये 14% वाढ झाली आहे.

 प्रतिवर्ष तुलना

Head

मे 2023

मे 2024

वाढ

नोंदणीकृत कर्मचाऱ्यांची संख्या

20.23 लाख

23.05 लाख

2.82 लाख 

 

 प्रतिमहिना तुलना

 Head

एप्रिल 2024

मे 2024

वाढ

महिनाभरातील नोंदणीकृत कर्मचाऱ्यांची संख्या

16.47 लाख

23.05 लाख

6.58 लाख

 

प्रतिमहिना तुलना

Head

एप्रिल 2024

मे 2024

वाढ

नव्याने नोंदणीकृत झालेल्या आस्थापनांची संख्या

18,490

20,110

1,620  

 

वेतनपटातरील  माहितीद्वारे, हे लक्षात येते की या महिन्यादरम्यान नोंदणीकृत एकूण 23.05 लाख कर्मचाऱ्यांची नव्याने नोंदणी झाली,यापैकी 11.15 लाख कर्मचारी 25 वर्षे वयोगटातील आहेत,तसेच एकूण नोंदणीतील हे प्रमाण सुमारे 48.37% आहे,

तसेच, वेतनपटाचे लिंगनिहाय विश्लेषण असे दर्शविते, की मे 2024 मध्ये महिला सदस्यांची निव्वळ नोंदणी 4.47 लाख आहे. याशिवाय, एकूण 60 पारलिंगी कर्मचाऱ्यांनी मे 2024 मध्ये कर्मचारी राज्य  विमा योजनेअंतर्गत नोंदणी केली आहे.यामुळे कर्मचारी राज्य विमा योजनेचे लाभ समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याच्या वचनबद्धतेची सुनिश्चिती होते.

वेतनपट डेटा निर्मिती सतत अद्ययावत होत असल्याने वेतनपट डेटा तात्पुरता असतो.

 

* * *

JPS/S.Patgaonkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2036326) Visitor Counter : 99