अवजड उद्योग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

विद्युत चलनशीलता प्रोत्साहन योजना (ईएमपीएस), 2024


देशात हरित चलनशीलता आणि विद्युत वाहनांच्या उत्पादनाच्या विकासाला गती देणार ही योजना

Posted On: 23 JUL 2024 9:50PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 23 जुलै 2024

अवजड उद्योग मंत्रालयाने 13 मार्च 2024 रोजी जारी केलेल्या राजपत्रित अधिसूचना 1334 (ई) द्वारे विद्युत चलनशीलता प्रोत्साहन योजना (इलेक्ट्रिक मोबिलिटी प्रमोशन स्कीम – ईएमपीएस) 2024 लागू केली आहे. देशात हरित चलनशीलता आणि विद्युत वाहन- (ईव्ही)  उत्पादनाच्या विकासाला गती देण्याचा या योजनेचा उद्देश आहे. योजनेचा कालावधी 01 एप्रिल 2024 ते 31 जुलै 2024 असे चार महिने असून अंदाजित खर्च 500 कोटी रुपये आहे.


निधीचे वितरण आणि उपभागांनुसार जास्तीत जास्त वाहनांना पाठबळ देण्यासाठी योजनेच्या खर्चाची विभागणी   01 एप्रिल 2024 ते 31 जुलै 2024 या कालावधीसाठी पुढीलप्रमाणे आहे –

S. No.

Component/ categories of vehicles

Maximum number of EVs to be supported

Total outlay (Rs. In crore)

1

e-2w

3,33,387

333.39

2

e-3w: e-Rickshaw/ e-cart

13,590

33.97

3

e-3w: L5

25,238

126.19

 

Total of Above

3,72,215

493.55

 


 

 

 

 

 

 

 

 

ईएमपीएस 2024 साठी मर्यादित निधी असून वाहनांच्या संख्येवर मर्यादा आहे आणि योजनेचा कालावधीही मर्यादित आहे; म्हणजेच विक्री आणि नोंदणीकृत ई-2डब्ल्यू आणि ई-3डब्ल्यू वाहने वर दिलेल्या गटांच्या व्याख्येनुसार संख्येच्या मर्यादेत किंवा निधीच्या उपलब्धतेनुसार किंवा 31 जुलै 2024 पर्यंत – यापैकी जे पहिले लागू होईल त्यानुसार, प्रोत्साहनपर मागणीसाठी अनुदानास पात्र ठरतील. ईएमपीएस 2024 योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर अनुदानासाठी पात्र ठरण्याकरता ईव्हीचे उत्पादन आणि नोंदणी योजनेच्या वैध कालावधीत झालेली पाहिजे.


उपरोल्लेखित विभागणीनुसार प्रोत्साहनपर मागणीसाठी असलेल्या खर्चाची एकूण रक्कम 493.55 कोटी रुपये इतकी मर्यादित आहे. योजनेसाठीचा किंवा त्यातील संबंधित भागांसाठीचा निधी 31 जुलै 2024 पूर्वी संपला तर योजना किंवा त्यातील ज्या भागाचा निधी संपला आहे तो भाग बंद करण्यात येईल. त्यासाठी केलेल्या दाव्यांची ईएमपीएस 2024 अंतर्गत दखल घेतली जाणार नाही. योजनेसाठी दाखल केलेले अर्ज “प्रथम येणाऱ्यास प्राधान्य” तत्त्वावर निकालात काढले जातील.

S.Patil/R.Bedekar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2036130) Visitor Counter : 72