सांस्कृतिक मंत्रालय

कला आणि संस्कृती यांना प्रोत्साहन आणि त्यांचे जतन

Posted On: 22 JUL 2024 4:08PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 22 जुलै 2024

केंद्रीय संस्कृती मंत्रालय केंद्रीय क्षेत्रातील विविध योजना लागू करत असते आणि त्यांच्या अंतर्गत देशातील आदिवासी भाग तसेच महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यासह देशभरात कला आणि संस्कृती यांना प्रोत्साहन देऊन त्यांचे जतन करण्यासाठी कार्यरत असलेल्या पात्र सांस्कृतिक संस्था/ व्यक्ती यांना आर्थिक पाठबळ देत असते. या सर्व योजनांची थोडक्यात माहिती परिशिष्ट I मध्ये दिली आहे.

गेल्या पाच वर्षांत पालघर जिल्ह्यासह महाराष्ट्र राज्यातील विविध सांस्कृतिक संस्था/ व्यक्ती यांना वेगवेगळ्या योजनांद्वारे वितरीत करण्यात आलेल्या निधीचा वर्षनिहाय तपशील परिशिष्ट II मध्ये दिला आहे.

केंद्रीय संस्कृती आणि पर्यटन विभाग मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांनी आज लोकसभेत लिखित उत्तराद्वारे ही माहिती दिली.

बीना यादव

परिशिष्ट I

दिनांक 22.07.2024 साठी लोकसभेतील अतारांकित प्रश्न क्र.166 ला दिलेल्या उत्तरातील भाग (अ) आणि (ब) सदर परिशिष्टात संदर्भित आहे.

परिशिष्ट II

दिनांक 22.07.2024 साठी लोकसभेतील अतारांकित प्रश्न क्र.166 ला दिलेल्या उत्तरातील भाग (क) सदर परिशिष्टात संदर्भित आहे.

गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रात विविध योजनांच्या माध्यमातून वितरीत करण्यात आलेल्या निधीचे तपशील

अनुक्रमांक योजनेचे नाव आर्थिक वर्ष
2019-20
(लाख रुपयांमध्ये)
आर्थिक वर्ष
2020-21
(लाख रुपयांमध्ये)
आर्थिक वर्ष
2021-22
(लाख रुपयांमध्ये)
आर्थिक वर्ष
2022-23
(लाख रुपयांमध्ये)
आर्थिक वर्ष
2023-24
(लाख रुपयांमध्ये)
  1.  
गुरु-शिष्य परंपरेला प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक मदत (रेपर्टरी अनुदान) 197.76 156.04 237.36 900.72 625.70
  1.  
राष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सांस्कृतिक संस्थेसाठी आर्थिक मदत  (आर.के.अभियानासह) 5.81 - - - 15.00
  1.  
सांस्कृतिक कार्यक्रम आणि उत्पादन अनुदान (सीएफपीजी) 38.97 56.27 63.63 104.12 24.64
  1.  
बौद्ध /तिबेटी संस्कृती आणि कला यांच्या विकासासाठी आर्थिक अनुदान - 20 15 38.25 26
  1.  
स्टुडीओ रंगमंचासह इमारत अनुदान - 8.8 5.4 - 8.00
  1.  
इतर उपयोजित सांस्कृतिक उपक्रम 35.48 - - - -
  1.  
संस्कृती क्षेत्रात अतुलनीय काम करणाऱ्या व्यक्तीला फेलोशिप देण्यासाठीची योजना 59.40 66.00 121.80 118.80 84.00
  1.  
विविध सांस्कृतिक क्षेत्रातील युवा कलाकारांना शिष्यवृत्त्या प्रदान करण्यासाठीची योजना 33.30 39.00 39.60 12.00 38.10
  1.  
सांस्कृतिक क्षेत्रातील संशोधनासाठी टागोर राष्ट्रीय फेलोशिप 17.13 3.60 30.10 - 33.60
  1.  
ज्येष्ठ कलाकारांना आर्थिक मदत 85.86 106.61 190.49 273.49 795.97


 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

अधिक तपशील जाणून घेण्यासाठी कृपया येथे क्लिक करून मूळ इंग्रजी बातमी मिळवा.

 


Jaydevi PS/S.Chitnis/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 



(Release ID: 2035048) Visitor Counter : 15


Read this release in: English , Hindi , Manipuri , Tamil