रसायन आणि खते मंत्रालय
केंद्रीय रसायन आणि खते मंत्री जगत प्रकाश नड्डा आणि राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी “ एडव्हांन्टेज भारतः इंडियन केमिकल्स अँड पेट्रोकेमिकल्स पेव्हींग द फ्युचर” या विषयावरील 13 व्या इंडिया केम आवृत्ती’चा केला शुभारंभ
Posted On:
20 JUL 2024 3:36PM by PIB Mumbai
केंद्रीय रसायने आणि खते मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी आज राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांच्या उपस्थितीत “ एडव्हांन्टेज भारतः इंडियन केमिकल्स अँड पेट्रोकेमिकल्स पेव्हींग द फ्युचर” या विषयावरील 13 व्या इंडिया केम आवृत्तीचे उद्घाटन केले. नड्डा यांनी 13 व्या इंडिया केम विषयीच्या एका माहिती पुस्तिकेचे देखील प्रकाशन केले. रसायने आणि पेट्रोकेमिकल्स विभागाच्या सचिव निवेदिता शुक्ला वर्मा या देखील यावेळी मंत्रालयाचे अधिकारी आणि रसायने आणि पेट्रोकेमिकल क्षेत्रातील उद्योगांच्या प्रतिनिधीसोंबत उपस्थित होत्या. या कार्यक्रमाने प्रदीर्घ वाटचाल केली आहे आणि यावर्षी मुंबईत ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या 13 व्या आवृत्तीसाठी सर्व सज्जता झाली आहे, अशा शब्दात जे. पी . नड्डा यांनी प्रशंसा केली. इंडिया केम 2024 ची “एडव्हांन्टेज भारतः इंडियन केमिकल्स अँड पेट्रोकेमिकल्स पेव्हींग द फ्युचर” ही संकल्पना देखील, भारताला 2025 पर्यंत 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टीकोनाला अनुरूप असल्याचे त्यांनी सांगितले.

इंडिया केम’च्या 13 व्या आवृत्तीचे आयोजन 17 ते 19 ऑक्टोबर दरम्यान मुंबईत होणार असल्याने 2024 हे वर्ष अतिशय महत्त्वाचे आहे, असे ते म्हणाले. आयातीवर भर देत या क्षेत्रातील संशोधन आणि विकास, आणि मनुष्यबळ प्रशिक्षणामुळे 2047 सालापर्यंत विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यामध्ये हे वर्ष महत्त्वाचे योगदान देईल, अशी आशा जे. पी. नड्डा यांनी व्यक्त केली.
जे. पी. नड्डा म्हणाले की या उद्योगाच्या वृद्धीसाठी सरकार वचनबद्ध आहे आणि सामान्यतः औद्योगिक विकासाला पाठबळ देण्यासाठी, तसेच विशेषत: रसायन क्षेत्राला बळकटी देण्यासाठी अनेक संरचनात्मक सुधारणा हाती घेतल्या आहेत आणि सरकारचे या क्षेत्राला विशेष प्राधान्य आहे. या क्षेत्राला बळकटी देण्यासाठी आवश्यक असलेली धोरणे सरकारकडून राबवण्यात येतील, अशी ग्वाही नड्डा यांनी दिली. मुंबईमध्ये होणार असलेल्या विचारमंथनातून जे निष्कर्ष प्राप्त होतील, त्या आधारे सरकार धोरणात्मक उपाययोजना करेल, असे त्यांनी नमूद केले.

***
M.Pange/S.Patil/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2034651)