पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी साधला दूरध्वनीवरून संवाद


पंतप्रधानपदी फेरनिवड झाल्याबद्दल लक्सन यांच्याकडून मोदी यांचे अभिनंदन

सामायिक लोकशाही मूल्ये आणि लोकांशी लोकांचा संपर्क यात द्विपक्षीय संबंधांची पाळमुळं आढळत असून हे संबंध अधिक वृद्धिंगत करण्याच्या वचनबद्धतेचा दोन्ही नेत्यांनी केला पुनरुच्चार

व्यापार, पशुसंवर्धन, औषधनिर्माण, शिक्षण, अवकाश आणि इतर क्षेत्रात सहकार्य वाढवण्याविषयी सहमती

न्यूझीलंडमध्ये भारतीय समुदायाचे हित जपल्याबद्दल मोदी यांनी मानले लक्सन यांचे आभार, भारतीय समुदायाच्या सुरक्षिततेची आणि आरोग्याची लक्सन यांनी दिली ग्वाही

Posted On: 20 JUL 2024 2:37PM by PIB Mumbai

 

न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला.

भारतातील सार्वत्रिक निवडणुकीमध्ये फेरनिवड झाल्याबद्दल लक्सन यांनी मोदी यांचे मनापासून अभिनंदन केले.

भारत-न्यूझीलंड संबंध हे समान लोकशाही मूल्ये तसेच लोकांशी लोकांच्या दृढ संबंधांवर आधारित असल्यामुळे, भविष्यात द्विपक्षीय सहकार्याला नव्या उंचीवर नेण्याच्या वचनबद्धतेचा दोन्ही नेत्यांनी पुनरुच्चार केला.

दोन राष्ट्रांमध्ये अलीकडेच उच्च-स्तरीय संपर्क आल्यामुळे द्वीपक्षिय संबंधांना चालना मिळाली असून व्यापार आणि आर्थिक सहकार्य, पशुसंवर्धन, औषधनिर्माण, शिक्षण, अवकाश यासह विविध क्षेत्रांमध्ये परस्पर हितासाठी द्विपक्षीय सहकार्य वाढवण्यावर त्यांची सहमती झाली.

न्यूझीलंडमधील भारतीय समुदायाचे हित जपल्याबद्दल मोदी यांनी लक्सन यांचे आभार मानले. भारतीय समुदायाची सुरक्षा आणि कल्याणासाठी सतत झटत राहू असे आश्वासन लक्सन यांनी दिले.

दोन्ही नेत्यांनी संपर्कात राहू असे आश्वासन एकमेकांना दिले.

***

M.Pange/P.Jambhekar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2034615) Visitor Counter : 74