दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

इंडिया मोबाईल काँग्रेस 2024 साठीच्या ‘द फ्युचर इज नाऊ’ या संकल्पनेचे केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य एम.सिंदिया यांच्या हस्ते अनावरण

Posted On: 19 JUL 2024 9:44AM by PIB Mumbai

केंद्रीय दूरसंचार तसेच ईशान्य प्रदेश विकास मंत्री ज्योतिरादित्य एम.सिंदिया यांच्या हस्ते काल इंडिया मोबाईल काँग्रेस (आयएमसी) 2024 साठीच्या ‘द फ्युचर इज नाऊ’ या संकल्पनेचे अनावरण करण्यात आले.भारत आजघडीला  कशा प्रकारे तंत्रज्ञानविषयक क्रांतीच्या केंद्रस्थानी आहे हे या संकल्पनेतून दिसते. तसेच आयएमसी 2024 जागतिक पातळीवरील विचारवंत, अग्रणी  आणि संशोधक अशा सर्व प्रमुख व्यक्तींना एकमेकांशी सहयोग साधून आपल्या जगात आज परिवर्तन घडवून आणणाऱ्या तंत्रज्ञानांना आकार देण्यासाठी एकत्र आणून भविष्य ही केवळ एक संकल्पना नसून ते वास्तवात घडते आहे हे दाखवून देण्याचा मंच आहे हे देखील यातून प्रतीत होते.

केंद्रीय संचार तसेच ईशान्य प्रदेश विकास मंत्री ज्योतिरादित्य एम.सिंदिया यांनी यावेळी इंडिया मोबाईल काँग्रेस 2024 मधील नोंदणीसाठीचे वैशिष्ट्यपूर्ण परस्परसंवादात्मक असे विशेष अॅप्लिकेशन आणि संकेतस्थळ देखील सुरु केले. य सुविधेचा वापर करत सर्वप्रथम या संकेतस्थळावर नोंदणी करत केंद्रीय मंत्री सिंदिया यांनी या प्रसंगी बीजभाषण देखील केले. यानंतर इंडिया मोबाईल काँग्रेसने सर्व प्रतिनिधी, अभ्यागत, शिक्षणक्षेत्र/महाविद्यालये, सरकार तसेच माध्यमांसाठी नोंदणी प्रक्रिया सुरु करत असल्याची घोषणा केली.

याप्रसंगी केलेल्या बीजभाषणात केंद्रीय मंत्री म्हणाले, “ही तंत्रज्ञान आणि दूरसंवाद विषयक सुविधा संधींचा एक मंच खुला करून देणारी आहे. हा दूरसंवाद आणि नेटवर्क भारताच्या पहिल्या गावातील लोक आणि भारताच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या गावांतील लोक यांना एकत्र आणणारी आहे.”  
या प्रसंगी, केंद्रीय दूरसंचार विभागाने दूरसंचार विषयक अभिनव संशोधन, या क्षेत्रातील कौशल्ये, सेवा, दूरसंचारसंबंधी उपकरणांची निर्मिती तसेच दूरसंचार अॅप्लिकेशन्स या क्षेत्रांतील अनुकरणीय तसेच अत्युत्कृष्ट योगदानासाठीच्या  पंडित दीनदयाळ उपाध्याय दूरसंचार उत्कृष्टता पुरस्कार 2023  वितरणाची घोषणा केली.
केंद्रीय मंत्री सिंदिया यांनी या कार्यक्रमात स्टार्ट अप्स आणि एमएसएमईज साठीची चाचणी योजना सुरु केली तसेच सायबर सुरक्षा क्षेत्रात क्षमता उभारणीसाठी एनटीआयपीआरआयटी आणि आयआयटी जम्मू या संस्थांमधील  सामंजस्य करारावर यावेळी स्वाक्षऱ्या झाल्या.

इंडिया मोबाईल काँग्रेस या आशियातील प्रमुख डिजिटल तंत्रज्ञानविषयक प्रदर्शनाचे हे आठवे वर्ष असून केंद्रीय दूरसंचार विभाग आणि सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडिया यांच्याकडे या काँग्रेसचे सह-यजमानपद आहे. यावर्षी नवी दिल्ली येथील प्रगती मैदानावर 15 ऑक्टोबरपासून इंडिया मोबाईल  काँग्रेस होणार आहे.

***

SushamaK/SanjanaC/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2034223) Visitor Counter : 117