प्रधान वैज्ञानिक सल्लागार कार्यालय, भारत सरकार

नेट झिरो लक्ष्य साध्य करण्याबाबतचा भारताचा ई-मोबिलिटी संशोधन आणि विकास आराखड्यावरील अहवाल भारत सरकारच्या प्रधान वैज्ञानिक सल्लागारांकडून जारी

Posted On: 16 JUL 2024 6:37PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 16 जुलै 2024

 

भारत सरकारचे प्रधान  वैज्ञानिक सल्लागार प्रा. अजय कुमार सूद यांनी आज (16 जुलै, 2024) नवी दिल्लीतील विज्ञान भवन ॲनेक्सी येथे “भारताचा ई-मोबिलिटी संशोधन आणि विकास आराखडा” अहवाल प्रसिद्ध केला. जागतिक वाहन उद्योग क्षेत्राचा तपशीलवार विस्तृत आढावा घेतल्यावर आणि भविष्यातील अत्याधुनिक तांत्रिक आवश्यकता लक्षात घेऊन  संशोधन आणि विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. हा आराखडा एनर्जी स्टोरेज सेल, ईव्ही एग्रीगेट्स, मटेरियल आणि रिसायकलिंग, चार्जिंग आणि रिफ्युएलिंग या चार महत्वाच्या क्षेत्रांमध्ये संशोधन प्रकल्पांचे वर्गीकरण करतो तसेच आगामी पाच वर्षांत आत्मनिर्भर होऊन जागतिक नेतृत्व मिळवण्याचे स्पष्ट मार्ग प्रदान करतो.

A group of people standing at a tableDescription automatically generated

भारताने 2070 पर्यंत नेट झिरो कार्बन उत्सर्जनाची वचनबद्धता साकार करण्याकरिता 2030 पर्यंत उत्सर्जन तीव्रतेमध्ये 45% घट आणि 2047 पर्यंत ऊर्जा स्वातंत्र्य मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे असे प्रा. सूद यांनी उदघाटनपर भाषणात नमूद केले. या दृष्टीकोनाचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे इलेक्ट्रिक वाहनांचा व्यापक अवलंब करण्याची, स्वदेशी ऊर्जा साठवण प्रणालीच्या उत्पादनाची आणि चार्जिंग पायाभूत सुविधांसाठी अक्षय ऊर्जा निर्मितीची गरज आहे. सध्या ई-मोबिलिटी मूल्य साखळी मोठ्या प्रमाणात आयातीवर अवलंबून असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. ई-मोबिलिटी मूल्य साखळीतील आयातीवरील आपले अवलंबित्व कमी करण्यावर आणि वाहन उद्योग क्षेत्रातील देशांतर्गत संशोधन आणि विकास क्षमता बळकट करण्यावर प्रा. सूद यांनी भर दिला.

A group of people sitting at a tableDescription automatically generated

भारतातील ऑटोमोबाईल क्षेत्र हे देशाच्या जीडीपीमध्ये सर्वात मोठे योगदान देणारे आहे आणि त्याचा विकासाचा चढता आलेख लक्षात घेता, भविष्यातही ते असेच चालू राहील हे प्रा. सूद यांनी नमूद केले. ही प्रगती देशाच्या नेट-झिरो दृष्टिकोनाशी सुसंगत करून वाहन उद्योग क्षेत्रात संशोधन आणि विकास आणि नवोन्मेषधारित विकासाची संस्कृती रुजवण्याच्या आगामी गरजेवर भर देत त्यांनी भाषणाचा समारोप केला. 

A group of people posing for a photoDescription automatically generated

संपूर्ण ई-मोबिलिटी संशोधन आणि विकास आराखडा अहवाल पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा:

https://psa.gov.in/CMS/web/sites/default/files/psa_custom_files/Printing%20Updated%20eMobility%20R%26D%20Roadmap%20document_11072024.pdf

 

* * *

N.Chitale/V.Joshi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2033719) Visitor Counter : 11