कायदा आणि न्याय मंत्रालय

'हमारा संविधान हमारा सन्मान' या कार्यक्रमाचे प्रादेशिक स्तरावरील दुसरे पर्व येत्या मंगळवारी उत्तर प्रदेशातील प्रयागराज इथे साजरे होणार


सबको न्याय, हर घर न्याय; नव भारत, नव संकल्प आणि विधी जागृती अभियान, यांसारख्या उप मोहिमांशी संबंधित उपक्रमांचेही आयोजन केले जाणार

या उपक्रमातील नागरिकांचा सहभाग वाढावा, यासाठी 'हमारा संविधान, हमारा सन्मान' या पोर्टलचाही होणार प्रारंभ

Posted On: 14 JUL 2024 12:45PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 14 जुलै 2024

 

भारतीय राज्यघटना व भारताचा प्रजासत्ताक देश म्हणून घोषित केल्याच्या घटनेच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त केंद्रीय विधि व न्याय मंत्रालयाच्या वतीने ‘आपले संविधान आपला सन्मान’ अर्थात 'हमारा संविधान हमारा सन्मान' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्रीय कायदा व न्याय मंत्रालयाच्या अखत्यारितील न्याय विभागामार्फत राबवल्या जात असलेल्या न्याय व्यवस्थेच्या संर्वकष उपलब्धतेसाठी अभिनव उपाययोजनांची निर्मिती उपक्रम अर्थात 'डिझायनिंग इनोव्हेटिव्ह सोल्युशन्स फॉर होलिस्टिक अॅक्सेस टू जस्टिस' (दिशा) या योजनेअंतर्गत या कार्यक्रमाचे आयोजन केले गेले आहे. हा प्रादेशिक स्तरावरील कार्यक्रम असून, या कार्यक्रमाचे हे दुसरे पर्व आहे. उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील अलाहाबाद मेडिकल असोसिएशन कन्व्हेन्शन सेंटर इथे येत्या १६ जुलै २०२४ रोजी हा कार्यक्रम होणार आहे. 

या कार्यक्रमाच्या निमित्ताने ‘मायगव्ह’ (MyGov) या व्यासपीठावरून दि. 24 जानेवारी ते 23 एप्रिल 2024 या कालावधीत घेण्यात आलेल्या ऑनलाइन स्पर्धांच्या विजेत्यांच्या पारितोषिकांचे वितरण या कार्यक्रमात केले जाणार आहे. या स्पर्धांमध्ये संविधान विषयक प्रश्नमंजुषा, पंच प्रण रंगोत्सव (पोस्टर बनवणे) आणि पंच प्रण अनुभव (रील बनवणे) अशा स्पर्धांचा समावेश होता. या कार्यक्रमात न्याय विभागाच्या न्याय बंधू कार्यक्रमात अंतर्गत नोंदणीकृत असलेल्या माननीय अलाहाबाद उच्च न्यायालयातील सामाजिक हितासाठी काम करत असलेल्या वकिलांच्या संघटनेचा (probono advocates panel) गौरवही केला जाणार आहे. या संघटनेने प्रो बोनो उपर्कमा अंतर्गत सामाजिक सेवे देण्याकरता नोंदणी करण्यासाठी असंख्य वकिलांना प्रोत्साहित केल्याच्या त्यांच्या कामाची दखल म्हणून  त्यांचा गौरव आणि सत्कार करण्यात येणार आहे.

या उपक्रमातील नागरिकांचा सहभाग वाढावा यासाठी कार्यक्रमाच्या वेळी 'हमारा संविधान हमारा सन्मान' या पोर्टलचा प्रारंभही केला जाणार आहे. हे पोर्टल अशा ज्ञानाचे भांडार म्हणून काम करेल, जिथे नागरिकांमध्ये संविधान आणि कायदेशीर अधिकारांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आवश्यक सर्व माहितीपूर्ण ज्ञान सहजतेने उपलब्ध असेल. कार्यक्रमाच्या वेळी या अभियानांतर्गत आजवर राबवण्यात आलेल्या उपक्रमांची झलकही उपस्थितांना दाखवली जाणार आहे. यासोबतच या कार्यक्रमात, घटनात्मक अधिकारांबद्दलच्या प्रबोधनात्मक उपक्रमांना अधिकाधिक सहभागपूर्ण आण संवादात्मक बनवण्यासाठी सामुदायिक प्रयत्न आणि सहकार्यावर आधारित, परस्पर सहकार्याच्या भावनेचा स्पर्श देण्यासाठीची दिनदर्शिका आणि आवश्यक संसाधनाविषयी माहिती देणारा उपक्रमही होणार आहे. 

या कार्यक्रमाला विधी आणि न्याय मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि संसदीय कार्य राज्यमंत्री अरुण राम मेघवाल तसेच अलाहाबाद उच्च न्यायालयाचे माननीय मुख्य न्यायाधीश अरुण भन्साळी उपस्थित राहणार आहेत. अलाहाबाद वकील संघटनेचे सदस्य वकील, सरकारी वकील, न्यायिक अधिकारीही या कार्यक्रमाला उपस्थित असतील. याशिवाय न्याय विभागाशी संबंधित भागधारकांव्यतिरिक्त गावपातळीवरील सामायिक सेवा केंद्रांमधील उद्योजक, प्रयागराज इथल्या ‘राजेंद्र प्रसाद नॅशनल लॉ इन्स्टिट्यूट’चे कुलगुरू, प्राध्यापक तसेच कायद्याचे विद्यार्थी, केंद्र व राज्य शासमाच्या प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी आणि नागरिकांसह सुमारे 800 जण या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

24 जानेवारी 2024 रोजी देशाच्या उपराष्ट्रपतींच्या हस्ते नवी दिल्ली येथील डॉ. बी. आर. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात 'हमारा संविधान हमारा सन्मान' या अभियानाचा  प्रारंभ झाला होता. नागरिकांमध्ये राज्यघटनेची समज आणि कायदेशीर हक्कांविषयीची जागरूकता खोलवर रुजवणे हे या मोहिमेचे उद्दीष्ट आहे. या अभिनयाला व्यापक यश मिळावे यादृष्टीने या अभियानातील नागरिकांचा सहभाग वाढवण्यासाठी तसेच या अभियानाला खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक बनवण्यासाठी हे अभियान प्रादेशिक स्तरावर राबविण्याचा निर्णय कालांतराने घेतला गेला. त्यानुसार, 9 मार्च 2024 रोजी राजस्थानमधील बिकानेर इथे देशाचे माननीय सरन्यायाधीश  न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांच्या हस्ते पहिल्या प्रादेशिक कार्यक्रमाचे उद्घाटन झाले होते. 

या अखिल भारतीय मोहिमेच्या काही महत्त्वाचे टप्प्यांविषची माहिती खाली दिली आहे:

  • प्रादेशिक स्तरावर 'हमारा संविधान हमारा सन्मान' उपक्रम साजरा करणे.
  • स्थानिक जनतेला समजू शकेल अशा सोप्या भाषेत आणि पद्धतीने राज्यघटनेविषयी जनजागृती करणे.
  • या अभियानाशी जोडलेल्या सबको न्याय,  हर घर न्याय; नव भारत, नव संकल्प आणि विधी जागृती अभियान यांसारख्या उप मोहिमांशी संबंधित उपक्रमांचे आयोजन करणे व त्यांचा प्रचार प्रसार करणे.
  • नागरिकांनी 'हमारा संविधान हमारा सन्मान' या पोर्टलवर सक्रीय सहभाग घेण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करणे.

 

* * *

S.Nilkanth/T.Pawar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2033116) Visitor Counter : 22