अन्न प्रक्रिया उदयोग मंत्रालय

केंद्रीय अन्नप्रक्रिया उद्योगमंत्री चिराग पासवान यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत भारतातील खाद्यान्न आणि संलग्न क्षेत्रातील कंपन्यांच्या प्रतिनिधींची गोलमेज बैठक संपन्न


या कंपन्यांच्या भविष्यातील योजना तसेच नवी दिल्लीत भारत मंडपम इथे येत्या 19 ते 22 सप्टेंबर या कालावधीत होणार असलेल्या वर्ल्ड फूड इंडिया 2024 या परिषदेच्या आयोजनात केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयासोबत भागीदारीत काम करण्याविषयीच्या शक्यता यावर बैठकीत चर्चा

Posted On: 13 JUL 2024 6:39PM by PIB Mumbai

 

केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री चिराग पासवान यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत भारतातील खाद्यान्न आणि संलग्न क्षेत्रातील कंपन्यांच्या प्रतिनिधींची गोलमेज बैठक झाली. या बैठकीत केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री चिराग पासवान यांनी उपस्थित प्रतिनिधींसोबत या कंपन्यांच्या भविष्यातील योजना तसेच आगामी वर्ल्ड फूड इंडिया 2024 या परिषदेच्या आयोजनात केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयासोबत भागीदारीत काम करण्याविषयीच्या त्यांच्या मतांबाबत चर्चा केली. नवी दिल्लीत भारत मंडपम इथे येत्या 19 ते 22 सप्टेंबर या कालावधीत वर्ल्ड फूड इंडिया 2024 ही परिषद आयोजित केली जाणार आहे. यासाठी आज आयोजित केलेल्या गोलमेज बैठकीत अन्न प्रक्रिया आणि संलग्न उद्योग क्षेत्राशी संबंधित 30 कंपन्यांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.

A group of men at a podiumDescription automatically generated

अन्न प्रक्रिया आणि संबंधित उद्योग क्षेत्रातल्या सर्व भागधारकांमध्ये केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाचे स्वतःचे वेगळे स्थान आहेआणि या उद्योगक्षेत्रात लाभ मिळवून देणाऱ्या अफाट संधी उपलब्ध आहेत, असे केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री चिराग पासवान यांनी उपस्थितांशी बोलताना सांगितले. आगामी वर्ल्ड फूड इंडिया 2024 मध्ये सर्व कंपन्यांनी आवर्जून सहभागी व्हावे असे आवाहनवजा हृद्य आमंत्रणही त्यांनी उपस्थित प्रतिनिधींना दिले. या उद्योग क्षेत्राला भेडसावत असलेल्या प्रत्येक समस्यांच्या सोडवणुकीसाठी आपले मंत्रालय सोबतीने काम करायला तयार आहे असे आश्वासनही त्यांनी दिले. आत्मनिर्भर आणि विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी या उद्योगक्षेत्राशी संबंधित उत्पादक, खाद्यान्न प्रक्रिया उद्योजक, शैक्षणिक संस्था, स्टार्टअप्स आणि नवोन्मेषकांनी आजवर केलेल्या अथक प्रयत्नांबद्दल त्यांनी त्यांची प्रशंसाही केली. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या वतीने (FSSAI - Food Safety and Standards Authority of India.), आगामी वर्ल्ड फूड इंडिया 2024 च्या आयोजनाच्या काळातच समांतरपणे 20 ते 21 सप्टेंबर या दोन दिवसांच्या कालावधीत यंदाच्या खाद्यान्न नियंत्रकांच्या जागतिक शिखर परिषदेचे (Global Food Regulators Summit ) आयोजन केले जाणार असल्याची माहितीही त्यांनी उपस्थित प्रतिनिधींना दिली.

केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाचे सहसचिव रणजीत सिंह यांनीही या उपस्थित प्रतिनिधींसोबत संवाद साधला. भारतीय अर्थव्यवस्थेत अन्न प्रक्रिया क्षेत्र महत्वाची भूमिका बजावत असल्याची बाब त्यांनी आवर्जून नमूद केली. या क्षेत्राशी संबंधित उद्योग जगतातील सर्व पातळीवरचे नेतृत्व  करणाऱ्या व्यक्ती, संबंधित शैक्षणिक संस्था आणि त्याच्या जोडील सरकारकडून समर्पण भावनेने केले जात असलेले प्रयत्न या आणि अशा सर्व भागधारकांच्या परस्परांना पुरक असलेल्या वचनबद्धतेमुळेच हे यश मिळू शकते ही बाबही त्यांनी अधोरेखित केली.

A group of people standing in a room

या बैठकीसाठी उपस्थित राहिलेल्या प्रतिनिधींनी देखील अन्न प्रक्रिया उद्योग क्षेत्राच्या अनुषंगाने भारतीय बाजारपेठेबाबतची आपली आशावादी मते आणि दृष्टीकोन मांडला. त्यांनी विशेषत: अन्न प्रक्रिया उद्योग क्षेत्राशी संबंधित उद्योग व्यवसायिक परिस्थिती सुधारण्यासाठी, केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजना आणि  पंतप्रधान किसान संपदा यासारख्या महत्वाच्या योजनेसह, अनेकविध अनुकूल धोरणात्मक उपक्रम राबवण्याच्या केंद्र सरकारच्या प्रयत्नांचे कौतुक केले. वर्ल्ड फूड इंडियाच्या या आधीच्या पर्वाच्या आयोजनाबद्दलही त्यांनी सरकारचे आभार मानले आणि वर्ल्ड फूड इंडिया 2024 मध्ये सहभागी होणार असल्याबाबद आश्वस्त केले. या उद्योग क्षेत्राच्या प्रगतिसाठी आपण एकत्रितपणे काम करू तसेच वर्ल्ड फूड इंडिया 2024 च्या आयोजनातही एकदिलाने सहभागी होऊ अशी वचनबद्धताही या सर्व प्रतिनिधींनी दर्शवली.

***

S.Patil/T.Pawar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2033053) Visitor Counter : 38