निती आयोग
azadi ka amrit mahotsav

एसडीजी भारत निर्देशांक  2023-24 प्रकाशित


जागतिक स्तरावर प्रतिकूल परिस्थिती असूनही भारताने शाश्वत विकास उद्दिष्टांच्या  दिशेने प्रगतीला गती दिली  आहे

Posted On: 12 JUL 2024 7:02PM by PIB Mumbai

 

दारिद्र्य निर्मूलन , योग्य काम पुरवणे , आर्थिक विकास , हवामान कृती आणि भूमीवरील   जीवन या उद्दिष्टांमध्ये लक्षणीय प्रगती.     

•           प्रधानमंत्री आवास योजना, उज्ज्वला, स्वच्छ भारत, जन धन, आयुष्मान भारत-पीएमजेएवाय , आयुष्मान आरोग्य मंदिर, पीएम -मुद्रा योजना, सौभाग्य, स्टार्ट-अप इंडिया यासारख्या सरकारच्या लक्ष्यित हस्तक्षेपांचा परिणाम झाला आणि जलद सुधारणा झाली.

सर्व राज्यांनी एकूणच  गुणांमध्ये सुधारणा दर्शवली आहे.

देशाचे एकूण एसडीजी गुण   2023-24 साठी 71 आहे, 2020-21 मधील  66 आणि 2018 मधील  57 च्या तुलनेत  लक्षणीय सुधारणा (बेसलाइन रिपोर्ट).    

•           2023-24 मध्ये राज्यांचे अंक  57 ते 79 दरम्यान  आहेत , जे 2018 च्या 42 ते 69 च्या श्रेणीच्या तुलनेत लक्षणीय सुधारणा दर्शवते.

•           उद्दिष्ट  1 ( गरिबी निर्मूलन   ), 8 (योग्य काम  आणि आर्थिक विकास  13 (हवामान कृती) आणि 15 (भूमीवरील   जीवन) मध्ये लक्षणीय प्रगती

उद्दिष्ट  13 (हवामान कृती) मध्ये 2020-21 मधील  54 वरून 2023-24 मध्ये 67 अंकापर्यंत   सर्वाधिक वाढ नोंदवली  आहे आणि त्याखालोखाल उद्दिष्ट  1 (गरिबी निर्मूलन ) 60 वरून 72 पर्यंत वाढ झाली आहे

आघाडीच्या 32 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश श्रेणीत 10 नवीन राज्ये   - अरुणाचल प्रदेश, आसाम, छत्तीसगड, मध्य प्रदेश, मणिपूर, ओडिशा, राजस्थान, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, आणि दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव          

•           2018 आणि 2023-24 दरम्यान, सर्वात वेगाने पुढे जाणारी राज्ये म्हणजे उत्तर प्रदेश (गुणांमध्ये 25 ने वाढ), त्याखालोखाल  जम्मू आणि काश्मीर (21), उत्तराखंड (19), सिक्कीम (18), हरियाणा (17), आसाम, त्रिपुरा आणि पंजाब ( प्रत्येकी 16), मध्य प्रदेश आणि ओडिशा (प्रत्येकी 15)

एसडीजी  इंडिया इंडेक्स 2023-24, शाश्वत विकास उद्दिष्टांबाबत   प्रगतीचे मूल्यमापन करण्यासाठी देशाच्या प्रमुख साधनाची चौथी आवृत्ती आज नीती आयोगाने प्रसिद्ध केली. नीती आयोगाचे उपाध्यक्ष सुमन बेरी यांनी हा निर्देशांक प्रकाशित  केला.

***

S.Kakade/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2032915) Visitor Counter : 446