रेल्वे मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

रेल्वे सुरक्षा दलाच्या महासंचालकांनी आरपीएफ कर्मचाऱ्यांसाठी भारतीय न्याय संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम यावरच्या पुस्तिका प्रकाशित केल्या

Posted On: 09 JUL 2024 9:51PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 9 जुलै 2024

 

नवीन कायदा व्यवस्थेकडे संक्रमण सुलभ करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून, रेल्वे सुरक्षा दलाचे (आरपीएफ) महासंचालक मनोज यादव यांनी आज नवी दिल्लीत भारतीय न्याय संहिता 2023 आणि भारतीय साक्ष अधिनियम 2023 यावरील सर्वसमावेशक पुस्तिका प्रकाशित केल्या.

या पुस्तिका आरपीएफ कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक मार्गदर्शक म्हणून काम करण्याच्या दृष्टीने तयार केल्या असून नवीन कायद्यांनुसार कायदेशीर प्रक्रियांची रूपरेषा यात आहे. आरपीएफ कर्मचाऱ्यांना भारतीय दंड संहिता आणि भारतीय पुरावा कायदा कडून संबंधित नवीन कायद्यांकडे सहज संक्रमण करता यावे हे या पुस्तिकेचे उद्दिष्ट आहे. विस्तृत स्पष्टीकरण आणि व्यवहार्य मार्गदर्शनासह, ही पुस्तिका रेल्वे सुरक्षा दलाला न्याय कायम  ठेवण्यास आणि कायदा व सुव्यवस्था प्रभावीपणे राखण्यास सक्षम बनवेल.

आरपीएफ कर्मचाऱ्यांचे कायदेविषयक प्राविण्य वृद्धिंगत करण्याच्या आणि दलातील कायदेशीर प्रक्रियेचे सुव्यवस्थित , सुरळीत आणि कार्यक्षम संक्रमण सुनिश्चित करण्याच्या   प्रयत्नांमध्ये या पुस्तिका एक महत्त्वपूर्ण मैलाचा दगड ठरतील आणि कायद्याचे राज्य आणि न्यायदान प्रक्रिया कायम राखण्याच्या  वचनबद्धतेला बळ मिळेल यावर रेल्वे सुरक्षा दलाच्या महासंचालकांनी  भर दिला.

छापील आवृत्त्यांसोबतच हँडबुकच्या ई-फ्लिपबुक्सचेही आज प्रकाशन करण्यात आले. भारतीय नागरीक सुरक्षा संहिता  2023 च्या डिजिटल आवृत्त्या JR RPF अकादमीच्या संकेतस्थळावर उपलब्ध केल्या आहेत आणि सर्व आरपीएफ  कर्मचाऱ्यांना मोबाईल फोन आणि डेस्कटॉप संगणक दोन्हीवर त्या सहज पाहता येतील. 

फ्लिपबुक्सच्या लिंक्स खालीलप्रमाणे आहेत:

BNS: https://jrrpfa.indianrailways.gov.in/assets/resource/BNS_LAPTOP/mobile.html

BNSS: https://jrrpfa.indianrailways.gov.in/assets/resource/BNSS_HANDBOOK_LAPTOP/mobile.html

BSA: https://jrrpfa.indianrailways.gov.in/assets/resource/BSA_LAPTOP/mobile.html

 

* * *

N.Chitale/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2031944) Visitor Counter : 123