आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमासाठी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या प्रधान सल्लागार म्हणून प्रा. (डॉ.) सौम्या स्वामिनाथन यांची नियुक्ती
Posted On:
09 JUL 2024 9:08PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 जुलै 2024
प्रा. (डॉ.) सौम्या स्वामिनाथन यांची राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमासाठी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या प्रधान सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाच्या प्रधान सल्लागार म्हणून, प्रा. (डॉ.) सौम्या स्वामीनाथन कार्यक्रमाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी संपूर्ण धोरणावर तांत्रिक सल्ला देतील, धोरणात्मक दिशानिर्देश आणि उत्तम परिणामांसाठी आवश्यक सुधारणा सुचवतील आणि संशोधन धोरणावर सल्ला देतील. जागतिक स्तरावर सर्वोच्च प्रतिभा असलेले तज्ञ गट तयार करण्यातही त्या मदत करतील. याव्यतिरिक्त, कार्यक्रमाच्या प्रभावाचे मूल्यांकन करण्यासाठी त्या केंद्रीय आरोग्य मंत्रालय, राज्य अधिकारी आणि विकास भागीदारांना समर्थन देतील.
प्रा. स्वामिनाथन या जागतिक आरोग्य संघटनेत माजी प्रमुख वैज्ञानिक होत्या आणि त्यांनी यापूर्वी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) महासंचालक म्हणूनही काम केले आहे.
* * *
N.Chitale/V.Joshi/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2031932)
Visitor Counter : 103