अर्थ मंत्रालय
सोळाव्या वित्त आयोगाकडून सल्लागार परिषद गठित
Posted On:
09 JUL 2024 9:01PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 जुलै 2024
सोळाव्या वित्त आयोगाने एक सल्लागार परिषद स्थापन केली असून त्यात खालील सदस्य आहेत:
- डॉ.डी.के. श्रीवास्तव
- नीलकंठ मिश्रा
- डॉ. पूनम गुप्ता
- प्रांजुल भंडारी
- राहुल बाजोरिया
डॉ. पूनम गुप्ता या सल्लागार परिषदेच्या निमंत्रक असतील.
सल्लागार समितीची भूमिका आणि कार्ये पुढीलप्रमाणे असेल :
- संदर्भ अटींपैकी किंवा संबंधित विषयांवर आयोगाला सल्ला देणे.
- कागदपत्रे किंवा संशोधन अभ्यास तयार करण्यात मदत करणे आणि वित्त आयोगाने नियुक्त केलेल्या अभ्यासावर देखरेख ठेवणे किंवा मूल्यांकन करणे, ज्यामुळे आयोगाला संदर्भ अटीं अधिक उत्तम जनता येतील.
- वित्तीय हस्तांतरणाशी संबंधित बाबींवर सर्वोत्तम राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पद्धती शोधून आणि त्याच्या शिफारशींची गुणवत्ता, पोहोच आणि अंमलबजावणी सुधारून आयोगाची कक्षा आणि आकलन विस्तारण्यात मदत करणे.
हे दिनांक 11 जून, 2024 च्या कार्यालयीन निवेदन क्र. 10/35/2024-Estt/SFC नुसार आहे.
* * *
N.Chitale/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2031930)
Visitor Counter : 82