दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण, ट्रायने, प्रसारण, केबल सेवा आणि प्रकाशनांसाठी नियामक चौकटीमध्ये सुधारणा अधिसूचित केल्या
इलेक्ट्रॉनिक प्रोग्रॅम गाईडमध्ये दूरचित्रवाणी वाहिन्यांची सूची आणि डीडी फ्री डिश प्लॅटफॉर्मला ऍड्रेसेबल प्रणालीमध्ये अद्ययावत करण्याबाबत शिफारशी
Posted On:
08 JUL 2024 9:48PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 जुलै 2024
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय) ने आज दूरसंचार (प्रसारण आणि केबल) सेवा (आठव्या) (ऍड्रेसेबल सिस्टम्स) दरपत्रक (चौथी दुरुस्ती) आदेश, 2024 (2024 पैकी 1) दूरसंचार (प्रसारण आणि केबल) सेवा इंटरकनेक्शन (ऍड्रेसेबल सिस्टीम्स) (सहावी दुरुस्ती) विनियम, 2024 (2024 चा 4); दूरसंचार (प्रसारण आणि केबल) सेवा गुणवत्ता आणि ग्राहक संरक्षण (ऍड्रेसेबल प्रणाली) (चौथी दुरुस्ती) नियमावली, 2024 (2024 चा 3) सेवा मानके आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाला (MIB) मधील चॅनेलच्या सूचीबाबत शिफारसी इलेक्ट्रॉनिक प्रोग्राम गाईड आणि डीडी फ्री डिश प्लॅटफॉर्मला ऍड्रेसेबल सिस्टमवर अद्ययावत करणे याबाबतचा आदेश जारी केला. काही कलमे वगळता, या दुरुस्त्या, अधिकृत राजपत्रात प्रकाशित झाल्यापासून 90 दिवसांनी अंमलात येतील.
केबल टीव्ही क्षेत्राच्या संपूर्ण डिजिटायझेशनच्या अनुषंगाने, ट्रायने 3 मार्च 2017 रोजी प्रसारण आणि केबल सेवांसाठी नियामक चौकट अधिसूचित केली होती. प्रसारण परिसंस्थेच्या आवश्यकतेनुसार आणि 2020 आणि 2022 मध्ये जारी केलेल्या सुधारणांद्वारे भागधारकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी संरचना तयार करण्यात आली आहे.
प्रसारक, मल्टी-सिस्टम ऑपरेटर -एमएसओ, डीटीएच ऑपरेटर आणि एलसीओ या भागधारकांनी वेळोवेळी प्राधिकरणापुढे या समस्या मांडल्या होत्या.
अशा समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि हितधारकांकडून सूचना मागवण्यासाठी प्राधिकरणाने 8 ऑगस्ट 2023 रोजी "प्रसारण आणि केबल सेवांच्या नियामक चौकटीचे पुनरावलोकन" या विषयावर एक सल्लामसलत पत्रिका जारी केली होती.
ट्रायने सध्याच्या सुधारणांमध्ये, 8 ऑगस्ट 2023 च्या सल्लामसलत पत्रिकेतल्या समस्यांचे निराकरण केले आहे. मात्र, या दुरुस्त्यांसाठी सल्लामसलत प्रक्रियेदरम्यान, विविध भागधारकांद्वारे काही इतर मुद्दे देखील उपस्थित केले गेले होते, ज्यावर विचार करण्यासाठी प्राधिकरणाला तपशीलवार सल्लामसलत करण्याची आवश्यकता आहे. या समस्या आणि मुद्द्यांची नोंद घेतली गेली असून या संदर्भातल्या सर्व मुद्द्यांवर तोडगा काढण्यासाठी ट्राय एक सर्वसमावेशक सल्लामसलत पत्रिका लवकरच जारी करणार आहे.
कोणत्याही स्पष्टीकरण/ माहितीसाठी, दीपक शर्मा, सल्लागार (B&CS), ट्राय, यांच्याशी ईमेल आयडी: advbcs-2@trai.gov.in किंवा दूरध्वनी +91-11-20907774 क्रमांकावर संपर्क साधला जाऊ शकतो.
* * *
S.Patil/B.Sontakke/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2031640)
Visitor Counter : 93