अल्पसंख्यांक मंत्रालय
आनंद विवाह कायद्याच्या अंमलबजावणीबाबत चर्चा करण्यासाठी राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाने राज्ये/ केंद्रशासित प्रदेश प्रशासनांसह बैठक घेतली
Posted On:
08 JUL 2024 6:47PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 जुलै 2024
आनंद विवाह कायद्याअंतर्गत देशातील शीख नागरिकांच्या विवाहांची अंमलबजावणी तसेच नोंदणी यावर चर्चा करण्यासाठी आज राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या प्रमुखांच्या अध्यक्षतेखाली 18 राज्ये/केंद्रशासित प्रदेश प्रशासनांची बैठक घेण्यात आली. महाराष्ट्र, झारखंड आणि मेघालयसह काही राज्यांच्या प्रशासनांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात सदर कायद्याच्या अंमलबजावणीविषयी माहिती दिली तर उर्वरित राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश प्रशासनांनी येत्या दोन महिन्यांच्या कालावधीत या कायद्याची अंमलबजावणी करण्याबाबत आश्वासन दिले आहे.
* * *
S.Patil/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2031599)
Visitor Counter : 87