राष्ट्रपती कार्यालय
ओडिशातील पुरी शहरात सुरू झालेल्या वार्षिक रथयात्रा उत्सवात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घेतला सहभाग
Posted On:
07 JUL 2024 9:09PM by PIB Mumbai
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज दि. 7 जुलै 2024 रोजी ओडिशातील पुरी शहरात सुरू झालेल्या वार्षिक रथयात्रा उत्सवात भाग घेतला.
या रथयात्रा उत्सवातील सहभागाचा आपला अनुभव राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी एक्स या समाजमाध्यमावरील संदेशातून मांडला आहे. : "जय जगन्नाथ! पुरी इथे आज झालेल्या वार्षिक रथयात्रा उत्सवादरम्यान भगवान बलभद्र, माता सुभद्रा आणि महाप्रभू श्री जगन्नाथजी यांचे तीन रथ हजारो भाविक ओढून नेत असल्याचे पाहणे हा अत्यंत दैवी अनुभव होता. शतकानुशतकापासून चालत आलेल्या या पौराणिक आध्यात्मिक वृद्धीच्या सोहळ्यात आज मी देखील सहभागी झाले होते, या पवित्र ठिकाणी जमलेल्या भाविकांच्या मांदियाळीशी एकरूप झाल्याचा अनुभव मला आला. हा क्षण माझ्यासाठी आपल्याला परमात्म्याच्या अस्तित्वाची अनुभुती देणाऱ्या क्षणांपैकीच एक क्षण होता. महाप्रभू जगन्नाथाच्या कृपेने संपूर्ण जगभर शांती आणि समृद्धी नांदो!
***
S.Kane/T.Pawar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2031454)
Visitor Counter : 72