कायदा आणि न्याय मंत्रालय

केंद्रीय कायदा व न्याय राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) आणि संसदीय कामकाज राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्या हस्ते 39 सी.बी.आय. अधिकारी/प्रतिष्ठित आणि गुणवान सेवा अधिकाऱ्यांना पोलीस पदके प्रदान

Posted On: 04 JUL 2024 4:38PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 4 जुलै 2024

 

केंद्रीय अन्वेषण संस्था (सी.बी.आय.) ने उत्तर प्रदेशातील गाझियाबाद इथे सी.बी.आय. अकादमीत औपचारिक समारंभ आयोजित केला होता. या कार्यक्रमात केंद्रीय कायदा व न्याय राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) आणि संसदीय कामकाज राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्या हस्ते 39 सी.बी.आय. अधिकारी/प्रतिष्ठित आणि गुणवान सेवा अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पोलिस पदके प्रदान करण्यात आली. पदकविजेते आणि त्यांच्या कुटुंबांचे अभिनंदन करत मेघवाल म्हणाले की पदकविजेत्यांच्या देशसेवेचा गौरव होण्याचा हा क्षण आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा आहे.

WhatsApp Image 2024-07-04 at 3.16.12 PM (1).jpeg

हे विजेते सर्वच सेवा अधिकाऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरले आहेत. सी.बी.आय.च्या भूमिकेचे महत्त्व अधोरेखित करून त्यांनी सांगितले की सी.बी.आय.ला समाजात ओळख आहे आणि त्याचबरोबर त्यांचे अन्वेषणाचे कार्य सर्वोत्तम आहे. सी.बी.आय.ने तपास केलेल्या प्रकरणांमध्ये आरोपीला न्यायालयात शिक्षा मिळण्याचे मोठे प्रमाण हे त्यांच्या तपासाचे यश दर्शवते. गुंतागुंतीच्या आणि संवेदनशील प्रकरणांमध्ये विविध भागीदारांकडून वारंवार होणारी सी.बी.आय. तपासाची मागणी ही सी.बी.आय. सर्वोत्कृष्ट तपास यंत्रणा असल्याचे लक्षण आहे.

98ffe62f-a865-4753-9c69-ff43f24174ae.jpg

1 जुलै 2024 पासून लागू झालेल्या नव्या फौजदारी कायद्यांविषयी मेघवाल यांनी सकारात्मकता व्यक्त करून सांगितले की या कायद्यांमुळे नागरिकांच्या जगण्यात सुलभता येईल. नव्या कायद्यांमुळे न्यायदानाची प्रक्रिया वेगवान होईल आणि सर्वच भागधारकांचा न्यायालयीन प्रक्रियेत जाणारा वेळ वाचेल.

 

* * *

S.Kane/R.Bedekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2030736) Visitor Counter : 13