युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय

टेनिसपटू रोहन बोपण्णा आणि श्रीराम बालाजी पॅरिस 2024 ऑलिम्पिक स्पर्धांपूर्वी दोन एटीपी स्पर्धांमध्ये खेळणार

Posted On: 04 JUL 2024 4:31PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 4 जुलै 2024

 

टेनिसपटू रोहन बोपण्णा याने, पॅरिस 2024 ऑलिम्पिक स्पर्धांपूर्वी आपल्याला आणि आपला पुरुष दुहेरीचा जोडीदार श्रीराम बालाजी याला दोन एटीपी टूर स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी सहाय्य करण्याची विनंती युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या मिशन ऑलिम्पिक सेलने (एमओसी) मान्य केली आहे.

रोहन बोपण्णा आणि श्रीराम बालाजी, त्यांचे प्रशिक्षक आणि फिजिओथेरपिस्ट यांच्यासह, ऑलिम्पिक स्पर्धांसाठी पॅरिसला जाण्यापूर्वी हॅम्बर्ग आणि उमग येथे एटीपी 500 स्पर्धांमध्ये भाग घेतील.

नेमबाज रिदम सांगवान, सरबज्योत सिंग, विजयवीर आणि अनिश भानवाला यांनी  वॉल्मेरेंजमधील ऑलिम्पिक प्रशिक्षण शिबिर आणि चेटरॉक्स येथील 2024 च्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेदरम्यान वैयक्तिक प्रशिक्षक अथवा ट्रेनर संबंधित खर्चासाठी केलेल्या अर्थसहाय्याच्या विनंतीलाही एमओसीने मंजुरी दिली आहे. टार्गेट ऑलिम्पिक पोडियम स्कीम (TOPS) मध्ये त्यांचा विमान प्रवास, निवास, जेवण, व्हिसाचा खर्च आणि स्थानिक वाहतूक खर्च अंतर्भूत आहे.  

स्कीट नेमबाज महेश्वरी चौहान आणि अनंतजीत सिंग नारुका यांनी अनुक्रमे अरेझो, इटली येथे रिकार्डो फिलीपेली, आणि Tiro A Volo Falco range, कॅपुआ, इटली येथे एन्नियो फाल्को या वैयक्तिक प्रशिक्षकांबरोबर सराव करण्यासाठी केलेल्या विनंतीलाही एमओसीने मान्यता दिली आहे.

बैठकीदरम्यान, एमओसीने स्टीपलचेसर अविनाश साबळे आणि पारुल चौधरी, यांना त्यांचे प्रशिक्षक स्कॉट सिमन्स यांच्या बरोबर, सेंट मॉरिट्झ, स्वित्झर्लंड येथे ऑलिम्पिक स्पर्धांपूर्वी  24 दिवस प्रशिक्षण देण्यासाठी सहाय्य करायला मान्यता दिली.  

महिला रिले 4x400 मीटर संघाला उपकरणे खरेदी करण्यासाठी मदत, टेबल टेनिसपटू हरमीत देसाई याचे जर्मनीमध्ये बिबेराच येथील प्रशिक्षण यासह या खेळाडूंसाठी उपभोग्य वस्तूंची खरेदी आणि सपोर्ट स्टाफसाठी शुल्क, यासाठी सहाय्य करायला एमओसीने मंजुरी दिली.  

एमओसीने पॅरिस ऑलिम्पिक खेळांसाठी TOPS च्या कोर गटात 400 मीटर धावपटू किरण पहल, उंच उडीपटू सर्वेश अनिल कुशारे आणि शॉट पुटर आभा खटुआ यांचा देखील समावेश केला आहे.

 

* * *

S.Kane/R.Agashe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2030733) Visitor Counter : 15