आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
डॉ. बी.एन. गंगाधर यांची राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती
Posted On:
03 JUL 2024 9:16PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 जुलै 2024
मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने (एसीसी) राष्ट्रीय वैद्यकीय आयोग आणि स्वायत्त मंडळांच्या पदांवर विविध व्यक्तींची नियुक्ती केली आहे. या नियुक्त्या 4 वर्षांच्या कालावधीसाठी असून, नियोक्ता 70 वर्षांचा होईपर्यंत, अथवा पुढील आदेश येईपर्यंत, यापैकी जे लवकर असेल, तोपर्यंत लागू राहील. नियुक्त झालेले सदस्य पुढील प्रमाणे:
- वैद्यकीय मूल्यांकन आणि मानांकन मंडळाचे अध्यक्ष, डॉ. बी.एन. गंगाधर, यांची राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे अध्यक्ष म्हणून [NMC कायदा, 2019 च्या कलम 4 नुसार] नियुक्ती.
- चित्रा तिरुनल इन्स्टिट्यूट फॉर मेडिकल सायन्सेस अँड टेक्नॉलॉजी, तिरुवनंतपुरमचे संचालक, डॉ. संजय बिहारी, यांची वैद्यकीय मूल्यांकन आणि रेटिंग मंडळाचे अध्यक्ष म्हणून [NMC कायदा, 2019 च्या कलम 17(2) नुसार] नियुक्ती.
- अपोलो हॉस्पिटल, मुंबईचे संचालक (ऑन्कॉलॉजी) डॉ. अनिल डिक्रूझ यांची पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण मंडळाचे पूर्णवेळ सदस्य म्हणून नियुक्ती [NMC कायदा, 2019 च्या कलम 17(2) नुसार].
मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने टाटा मेमोरियल सेंटर, मुंबई येथे एमेरिटस प्राध्यापक पदावर कार्यरत डॉ. राजेंद्र अच्युत बडवे यांची पदवी-पूर्व वैद्यकीय शिक्षण मंडळाचे अर्धवेळ सदस्य म्हणून 2 वर्षांच्या कालावधीसाठी नियुक्ती केली असून, 70 वर्षे वयापर्यंत, अथवा पुढील आदेश येईपर्यंत, यापैकी जे लवकर असेल, तोपर्यंत ती लागू राहील.
* * *
S.Kane/R.Agashe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2030551)
Visitor Counter : 168