अवजड उद्योग मंत्रालय
राज्यमंत्री भूपतीराजू श्रीनिवास वर्मा यांनी "एक पेड माँ के नाम" मोहिमेला समर्थन देण्यासाठी एक रोप लावले
Posted On:
03 JUL 2024 4:53PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 जुलै 2024
पोलाद आणि अवजड उद्योग राज्यमंत्री श्री भूपतीराजू श्रीनिवास वर्मा यांनी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या "एक पेड माँ के नाम" या विशेष मोहिमेचा भाग म्हणून एक रोप लावले.

यावेळी बोलताना राज्यमंत्री म्हणाले की, “आईच्या नावाने एक झाड” “एक पेड माँ के नाम” ही मोहीम म्हणजे आपण सर्वांनी आपल्या पर्यावरणाची काळजी घेण्यासाठी केलेले आवाहन आहे. ही छोटीशी कृती हवामान बदलाशी लढा देण्यासाठी, प्रदूषण कमी करण्यात आणि आपला परिसर हिरवागार बनविण्यात आपले योगदान देऊ शकते.

या मोहिमेत सर्वांनी सामील व्हावे आणि आपण केलेल्या वृक्षारोपणाच्या कथा सामाजिक माध्यमांवर सामायिक करून या मोहिमेला एक मोठी चळवळ बनवावी, असे आवाहन यावेळी वर्मा यांनी केले. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या महान नेतृत्वाची प्रशंसा करून आणि पोलाद आणि अवजड उद्योग मंत्रालयाने हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल त्यांचे आभार मानून त्यांनी या उपक्रमाचा समारोप केला.
* * *
JPS/S.Patgaonkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2030426)
Visitor Counter : 65