शिक्षण मंत्रालय
एनएमएमएसएस अंतर्गत 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी(30 जून 2024 पासून प्रभावी) अर्ज सादर करण्यासाठी राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल(NSP) खुले
Posted On:
02 JUL 2024 3:53PM by PIB Mumbai
पुनर्रचना केलेले होम पेज असलेले वन टाईम रजिस्ट्रेशन(OTR) अर्ज, नवे मोबाईल ऍप आणि एक अद्ययावत वेब आवृत्ती सुरू करण्यात आली आहे आणि ती आता लाईव्ह आहे आणि जनतेला हाताळण्यासाठी उपलब्ध आहे, ज्यामुळे आता विद्यार्थी सोयीस्कर पद्धतीने ओटीआरसाठी राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवर (NSP) ऑनलाईऩ नोंदणी करू शकणार आहेत. एनएसपी पोर्टल आता वन टाईम रजिस्ट्रेशनसाठी तसेच नव्या आणि नूतनीकरण केलेल्या शिष्यवृत्तींसाठी खुले झाले आहे.
एनएसपीवर नवे आणि नूतनीकृत अर्ज दाखल करण्यासाठी ओटीआरची गरज आहे. विद्यार्थ्यांसाठी ओटीआर मॉड्युल वर्षभर खुले आहे. ओटीआर हा आधार/आधार नोंदणी आयडी आधारित एक वैशिष्ट्यपूर्ण 14 अंकी क्रमांक आहे. एनएसपीवर शिष्यवृत्तीकरता अर्ज करण्यासाठी ओटीआरची गरज असते.
ओटीआरची यशस्वी पूर्तता केल्यानंतर एक ओटीआर आयडी जारी केला जातो जो विद्यार्थ्याच्या संपूर्ण शैक्षणिक जीवनचक्रासाठी वैध असतो. अर्ज दाखल केल्यावर ओटीआर आयडीनुसार एप्लिकेशन आयडी जनरेट होतो. एकाच वेळी एका ओटीआर आयडीसाठी एकापेक्षा जास्त एप्लिकेशन आयडी ऍक्टिव्ह नाहीत याची सिस्टिममध्ये काळजी घेतली जाते. एनएमएमएसएस करिता 2024-25 या वर्षासाठी एनएसपीवर नवे/नूतनीकृत अर्ज दाखल करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 ही अंतिम तारीख आहे.
ज्या विद्यार्थ्यांनी एनएसपीवर 2023-24 या वर्षात अर्ज केले आहेत त्यांना पोर्टलच्या माध्यमातून ओटीआर/ संदर्भ क्रमांक देण्यात आले आहेत आणि एसएमएसच्या माध्यमातून सूचित करण्यात आले आहे.
***
S.Kane/S.Patil/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2030261)
Visitor Counter : 90