संरक्षण मंत्रालय
हैदराबादमध्ये बेगमपेठ येथे हवाईदल प्रमुखांच्या हस्ते वेपन सिस्टिम्स स्कूलचे उद्घाटन
Posted On:
02 JUL 2024 2:11PM by PIB Mumbai
हैदराबादमध्ये बेगमपेठ येथील हवाई दलाच्या तळावर हवाई दल प्रमुख एयर चीफ मार्शल विवेक राम चौधरी यांच्या हस्ते 1 जुलै 2024 रोजी वेपन सिस्टिम्स स्कूल (WSS) चे उद्घाटन करण्यात आले. त्यामुळे भारतीय हवाई दलाच्या इतिहासात एका नव्या अध्यायाची सुरुवात झाली आहे. भारतीय हवाई दलाचे रुपांतर एका भविष्यवेधी दलामध्ये करण्यासाठी आणि त्याच्या विविध प्रणालींमध्ये नवे बदल करण्यासाठी या नव्या प्रशिक्षण आस्थापनेची स्थापना करण्यात आली असून भारतीय सशस्त्र दलांसाठी विशेषतः हवाई दलासाठी हे एक मोठे पाऊल आहे. डब्लूएसएस प्रभाव आधारित प्रशिक्षण देईल जे समकालीन स्वरुपाचे असेल आणि भारतीय हवाई दलाच्या गरजांना अनुसरून नव्याने तयार केलेल्या शाखेच्या अधिकाऱ्यांना तयार करेल. डब्लूएसएसच्या उद्घाटनामुळे डब्लूएस शाखेच्या फ्लाईट कॅडेट्सना या संस्थेत त्यांच्या द्वितीय सत्राचे प्रशिक्षण मिळेल. नव्या शाखेत चार प्रकार आहेत. फ्लाईन्ग स्ट्रीम सुखोई- 30 MKI आणि सी-130J यांसारख्या हवेत उडणाऱ्या प्लॅटफॉर्म्सवरील शस्त्रे आणि प्रणालींचे परिचालन करेल, रिमोट स्ट्रीम दूरनियंत्रकाद्वारे उड्डाण करणाऱ्या विमानांचे परिचालन करेल, मिशन कमांडर आणि ऑपरेटर्स पृष्ठभागावरून हवेत आणि पृष्ठभागावरून पृष्ठभागावरील शस्त्र प्रणालीचे परिचालन करतील आणि इंटेलिजन्स सिस्टीम्स अंतराळातील इंटेलिजन्स आणि इमेजरीसाठी असेल.
यावेळी बोलताना हवाई दल प्रमुखांनी अधोरेखित केले की डब्लूएस शाखेच्या निर्मितीमुळे जमिनीवरील ऑपरेटर्स आणि शस्त्र प्रणालीमधील विशेषज्ञ एकाच छत्राखाली येतील ज्यामुळे त्यांच्या युद्ध लढण्याच्या क्षमतांमध्ये लक्षणीय वाढ होईल.
नव्याने स्थापन झालेल्या शाखेतील प्रणेते असल्याने येथील प्रशिक्षक हे एका स्तंभाप्रमाणे असतील ज्यांच्यावर या संपूर्ण दूरदृष्टीपूर्ण प्रशिक्षणाचा डोलारा अतिशय भक्कमपणे उभा राहील आणि निर्णायक हवाई सामर्थ्य प्रदान करेल. या स्कूलच्या संस्थापक सदस्यांचे कौतुक करत हवाई दल प्रमुखांनी सर्व कर्मचाऱ्यांना आवाहन केले की त्यांनी या प्रशिक्षण संस्थेला देशातील शस्त्र प्रणाली प्रशिक्षणाचे नोडल केंद्र बनवण्यासाठी प्रयत्न करावेत.


***
S.Kane/S.Patil/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2030212)