सांस्कृतिक मंत्रालय

युग युगीन भारत संग्रहालय, भारताच्या समृद्ध वारशाचा पुरावा आणि लोकशाहीच्या जननीचा वारसा असेल”: केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत

Posted On: 29 JUN 2024 5:07PM by PIB Mumbai

 

दिल्लीतील सेंट्रल व्हिस्टा पुनर्विकास प्रकल्पाचा एक भाग म्हणून उत्तर आणि दक्षिण ब्लॉकमध्ये बांधल्या जाणाऱ्या आगामी युग युगीन भारत संग्रहालयासंदर्भात सांस्कृतिक मंत्रालयाने चार दिवसीय आंतर-मंत्रालयीन भागधारक सल्लामसलत आणि क्षमता निर्माण कार्यशाळेचे आयोजन केले होते.  ही कार्यशाळा 26 ते 29 जून 2024 दरम्यान नवी दिल्लीतील भारत मंडपम् येथे आयोजित करण्यात आली. कार्यशाळेच्या शेवटच्या दिवशी, केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत आणि मंत्रालयाचे सचिव गोविंद मोहन यांच्यासह वरिष्ठ अधिकारी तसेच भारतातील फ्रान्सचे राजदूत डॉ. थियरी माथौ यांनी कार्यक्रमाला हजेरी लावली.

या सल्लामसलत कार्यशाळेत, आगामी युग युगीन भारत (कालातीत आणि शाश्वत भारत) संग्रहालयाविषयी चर्चा करण्यासाठी खाजगी आणि सरकारी अशा संग्रहालय परिसंस्थेतील प्रतिनिधी उपस्थित होते. क्षमता निर्माण चर्चासत्राचे नेतृत्व, फ्रान्स म्युझियम्स या आंतरराष्ट्रीय संग्रहालय सल्लागार समितीच्या तज्ञांच्या गटाने केले.

हे संग्रहालय भारताच्या समृद्ध वारशाचा आणि प्रगतीच्या अविचल भावनेचा पुरावा म्हणून उभे राहील, कारण देशाच्या भूतकाळातूनच  प्रगतीची प्रेरणा मिळते,” असे, या चार दिवसीय क्षमता निर्माण कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी बोलताना, केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत म्हणाले. युग युगीन भारत संग्रहालय केवळ पारंपारिक संग्रहालय नसून ते सर्वसमावेशकतेच्या भावनेला मूर्त रूप देईलअसेही त्यांनी सांगितले.  हे जनतेचे संग्रहालय असेल ज्यामध्ये सामुदायिक कथांना केंद्रस्थानी ठेवलेले असेल आणि जे लोकशाहीची जननी म्हणून भारताच्या वारशाचा दाखला असेल.असेही ते म्हणाले.

Image

IMG_5899.jpeg

भारताचे नवीन राष्ट्रीय संग्रहालय, भारताच्या मध्यवर्ती प्रशासकीय क्षेत्राची सुधारणा करण्याच्या प्रयत्नांच्या रुपात हाती घेण्यात आलेल्या, सेंट्रल व्हिस्टा पुनर्विकास प्रकल्पाचा एक भाग असून, नवी दिल्लीतील रायसीना हिल भागातील उत्तर आणि दक्षिण ब्लॉक येथे उभारले जाणार आहे.  हे संग्रहालय 1,54,000 चौरस मीटर क्षेत्रात पसरलेले असून, ते जगातील सर्वात मोठे संग्रहालय असणार आहे.  18.05.2023 रोजी संस्कृती मंत्रालयाच्या GLAM (गॅलरी, लायब्ररी, आर्काइव्ह्ज आणि म्युझियम) विभागातर्फे आयोजित पहिल्या आंतरराष्ट्रीय संग्रहालय प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या संग्रहालयाच्या व्हिडिओ वॉक थ्रू चे प्रदर्शन करण्यात आले होते, आणि  जुलै 2023 मध्ये भारत मंडपम् च्या उद्घाटनप्रसंगी त्याचे पुन्हा एकदा प्रदर्शन करण्यात आले होते.

Image

***

M.Pange/S.Mukhedkar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2029532) Visitor Counter : 41