आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव गणपतराव जाधव आणि अनुप्रिया सिंग पटेल यांनी आयुष्मान भारत, गुणवत्त स्वास्थ्य कार्यक्रमात तीन उपक्रमांचे केले अनावरण
कार्यक्रमादरम्यान आयुष्मान आरोग्य मंदिरांसाठी राष्ट्रीय गुणवत्ता हमी मानके मूल्यांकन, भारतीय सार्वजनिक आरोग्य मानकांसाठी डॅशबोर्ड आणि अन्न विक्रेत्यांसाठी स्पॉट फूड लायसन्सच्या वितरणाला सुरुवात
Posted On:
28 JUN 2024 7:54PM by PIB Mumbai
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव गणपतराव जाधव आणि अनुप्रिया सिंह पटेल यांनी आज आयुष्मान भारत, गुणवत्त स्वास्थ्य कार्यक्रमात तीन नवीन उपक्रमांचा शुभारंभ केला. हे उपक्रम आरोग्यसेवा सुधारण्यात आणि भारतातील व्यवसाय सुलभतेस प्रोत्साहन देण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील.
केंद्रीय मंत्र्यांनी आयुष्मान आरोग्य मंदिरांसाठी (एएएम) आभासी राष्ट्रीय गुणवत्ता हमी मानके (एनक्यूएएस ) मूल्यांकन, भारतीय सार्वजनिक आरोग्य मानके (आयपीएचएस) संबंधित अनुपालनाचे जलद निरीक्षण करण्यासाठी राष्ट्रीय, राज्य आणि जिल्हा आरोग्य संस्था आणि सुविधांना मदत करणारे डॅशबोर्ड आणि अन्न विक्रेत्यांसाठी स्पॉट फूड लायसन्स आणि नोंदणी उपक्रम सुरू केले.
कार्यक्रमात, केंद्रीय मंत्र्यांनी आभासी मूल्यांकन केलेल्या एएएम -एससी ला राष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य मानक प्रमाणपत्र प्रदान केले.
कार्यक्रमादरम्यान, एकात्मिक सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळांसाठी (आयपीएचएल ) राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानके देखील जारी केली गेली. ही मानके एकात्मिक सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळांमधील व्यवस्थापन आणि चाचणी प्रणालींची गुणवत्ता आणि क्षमता सुधारतील. ज्यामुळे चाचणी परिणामांची विश्वसनीयता सुधारेल आणि चिकित्सक, रुग्ण आणि जनसामान्यांमध्ये प्रयोगशाळा अहवालांबद्दल विश्वास वाढेल. यावेळी 'कायाकल्प' साठी सुधारित मार्गदर्शक तत्त्वे देखील जारी केली गेली.
तत्काळ अन्न परवाना उपक्रमाचा शुभारंभ हे एक नवीन क्रांतिकारी कार्य आहे ज्यामुळे अन्न सुरक्षा आणि अनुपालन प्रणाली ( एफओएससीओएस ) द्वारे तत्काळ परवाने आणि नोंदण्या जारी केल्या जातील. अन्न सुरक्षा आणि अनुपालन प्रणाल FoSCoS ही संपूर्ण भारतात सर्व प्रकारच्या अन्न सुरक्षा नियामक गरजांना पूर्ण करणारी अत्याधुनिक माहिती तंत्रज्ञान युक्त प्रणाली आहे. ही नवोन्मेषी प्रणाली परवाना आणि नोंदणी प्रक्रियांना सुलभ करते आणि वापरकर्त्यांसाठी एक सुधारित अनुभव प्रदान करते.
यापूर्वी, भारतभरातील विविध आरोग्य सुविधांमधील आरोग्य कर्मचाऱ्यांनी एनक्यूएएस प्रशिक्षणाचा आणि त्यांच्या सुविधांना एनक्यूएएस प्रमाणपत्र मिळवण्याच्या प्रवासाचा अनुभव तसेच प्रमाणपत्रामुळे झालेल्या बदलांचा अनुभव सामायिक केला. देशभरातील अन्न विक्रेत्यांनी देखील त्यांच्या स्टॉलसाठी भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण परवाना आणि नोंदणी मिळवण्याचा अनुभव सामायिक केला.
***
S.Patil/G.Deoda/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2029417)
Visitor Counter : 103